ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
भंडारा :- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून भंडारा येथील विश्राम येथे शनिवार १५ जूनला साकोली येथील पत्रकार तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा भंडारा अध्यक्ष आशिष चेडगे यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते त्यामध्ये अचल मेश्राम, भाऊ कातोरे जिल्हा प्रेमी, गोविंदा कातोरे पोलीस पाटील, पंकज वानखेडे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार प्रा. प्रेमानंद हटवार, यावेळी प्रा. जांगडे, मनोज बागडे, प्रेमसागर गणवीर, प्रा. राहुल मानकर, अमृत बनसोड, पत्रकार समाजभूषण डी जी रंगारी, सूर्यभान हुमणे, धनपाल गडपायले, शिलवंत मेश्राम, चंद्रमणी गोंडाने समाजभूषण,आदी मान्यवर व असंख्य कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य साकोली तालुका अध्यक्ष निलय झोडे, शहर अध्यक्ष ऋग्वेद येवले, पदाधिकारी मनिषा काशिवार, ताराचंद कापगते, रवि भोंगाणे, किशोर बावणे, सत्यजित गजभिये, दुर्गेश राऊत, जयकृष्ण डुंभरे, शेखर इसापूरे, चेतक हत्तीमारे यांसह श्री बाल गणेश उत्सव मंडळ गणेश वार्ड साकोली पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.