
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी येथील खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे कंचनराव खेमगिरजी गिरी माहुली यांची अध्यक्ष म्हणून तर राजेश मधुकरजी कडू यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
पारशिवनी खरेदी-विक्री सहकारी मर्या=पारशिवनी तालुका येथील संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रिया आज दिनांक १६ जुन 2023 ला निवडणूक अधिकारी वानखेडे यांनी पुर्ण केली.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १० तर काॅग्रेसचे ५ उमेदवारानी सहभागी होऊन झालेल्या गुप्त मतदान प्रक्रियेतून निकाल जाहीर करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंचनराव खेमगिरजी गिरी यांचा अध्यक्ष पदासाठी तर राजेश मधुकरजी कडू यांचा उपाध्यक्ष पदासाठी फार्म होता तर काॅग्रेसचे वतीने अध्यक्ष पदासाठी पुरुषोत्तम मुकुंदराव जवंजाळ नयाकुंड व उपाध्यक्ष पदासाठी आनंदराव काकडे यांनी फार्म भरलेला होता.
अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे कंचनराव गिरी यांना ८ मते तर उपाध्यक्ष राजेश कडू यांना ९ मते मिळाली.
काॅग्रेसचे पुरुषोत्तम जवंजाळ यांना ७ मते व आनंदराव काकडे यांना ६ मते मिळाली.या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे दोन मते फुटली आहे.
*काॅग्रेसने केला चमत्कार… ५ चे ७ केले..*
पारशिवनी खरेदी-विक्री सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचे ५ उमेदवार अविरोध निवडून आले होते.सत्ता काबीज करण्यासाठी फक्त ३ उमेदवार निवडून आणण्यासाठी काॅग्रेसच्या वतीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
परंतु या निवडणुकीत १० ही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडणूक आले होते..
पण आज झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत काँग्रेसला ७ मते मिळाली हा चमत्कारच आहे.
म्हणजे भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवारांनी काॅग्रेसच्या बाजूला मतदान केले. अखेर काॅग्रेसने ५ वरुन ७ चा टप्पा गाठला हा भारतीय जनता पक्षा करिता आत्मचिंतनाचा विषय आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूकीत आपली सत्ता काबीज करण्यासाठी माजी मंत्री सुनील बाबू केदार व राजेंद्रजी मुळक व चंद्रपालजी चौकसे यांच्या कुशलता पुर्वक मोर्चेबांधणीत भारतीय जनता पक्षाला हा मोठा हादरा असुन आता आपले दोन उमेदवारांनी काॅग्रेसच्या उमेदवारांना मतदान करुन भारतीय जनता पक्षाला आत्मचिंतन करण्यात भाग पाडले आहे.
*भाजपाचे दोन उमेदवार काॅग्रेसच्या दावणीला*
पारशिवनी खरेदी-विक्री सहकारी मर्या संस्था निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सत्ता कायम ठेवण्यासाठी सुधाकर मेंघर सदस्य जिल्हा नियोजन समिती प्रकाशभाऊ वांढे यांच्या कुशल मार्गदर्शनात निवडणूकीची रणनीती आखली व आपले उमेदवार निवडून आनले.
पण आज झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार फितूर झाल्याने भाजपाची चिंता वाढली आहे.
हे विशेष.
नवनियुक्त अध्यक्ष कंचनराव गिरी व उपाध्यक्ष राजेश कडू यांचे सुधाकर मेंघर सदस्य जिल्हा नियोजन समिती यांनी अंभिनंदन केले तर डॉ. प्रमोद भड,राहुल नाखले नगरसेवक,विजय उपासे उपसरपंच ग्रामपंचायत करंभाड,जिल्हा उपाध्यक्षरेखा दुनेदार,सरपंच फजित सहारे,सागर सायरे नगरसेवक आदिनी अंभिनंदन केले.