21 जुन योग दिन म्हणून होणारा साजरा..

 

डॉ.जगदिश वेन्नम

     संपादक 

गडचिरोली,(जिमाका)दि.16: भारत सरकार आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार 21 जुन या दिवशी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. 

     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2014 च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणुन दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला होता.

      महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण 3016/प्र.क्र.96/क्रीयुसे 1 दिनांक 08 जून, 2016. नुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुका मुख्यालयी व ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात येते सर्वांचे सार्वतनिक आरोग्य आणि भावनिक निरोगीपणा सुधारणा एक लक्षणीय मालमत्ता म्हणून त्याचे महत्व आणी योगदान यावर प्रकाश टाकुन योगाचा सराव सुरु ठेवण्यासाठी लेाकांना प्रेरणा देणे हे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्यिष्ट आहे.

     आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन जिल्हा प्रशासन ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, जिल्यातील विविध योग संघटना ,योगाशी निगडित विविध मंडळे, यांच्या सयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्याठाच्या प्रांगनात योग प्रात्यक्षीके व योग दिवस दि. 21 जून, 2022 रोजी सकाळी 6.00 वाजता जिल्याचा मुख्य कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील/ गडचिरोली शहरातील सर्व नागरीक महिला युवक-युवती क्रीडप्रेमी योगपटु महाविद्यालयातील, शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी शासकीय कार्यालयातील जिल्हा परिषद व शासनाच्या विविध विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी जास्तीत संख्येने सहभागी व्हावे व तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा स्तरावर जागतीक योग दिनाचे आयोजन करावे व आयोजनाबाबतचा अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली हे कळवितात.