आरमोरी तालुक्यातील ‘नरचुली’ येथे “श्रमदानातून” नाली सफाईचे काम जोमात…

 

प्रितम जनबंधु

संपादक 

     आरमोरी तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या तद्वतच निसर्गाच्या सान्निध्यात डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या ग्रामपंचायत नरचुली अंतर्गत मौजा नरचुली येथे आज दि. १६ जुन २०२३ पासुन स्थानीक वासीयाच्या पुढाकाराने श्रमदानातून मान्सूनपुर्व नालीसफाई चे काम अगदीच जोमाने व सुरळीत चालु आहे.

      म्हणतात ना, “स्वच्छ गाव सुदर रस्ता, हाच खरा गावाचा गुलदस्ता” सबब उक्तीचा ध्यास उराशी बाळगून नरचुली वासीयानी श्रमदानातून नालीसफाईचे काम हाती घेतले असावे असे सुनियोजित चित्र पाहावयास मिळतआहे. सदर गावकऱ्यांचा श्रमदानातून नालेसफाईचा घेतलेला वसा कौतुकास्पद व गौरवाची बाब आहे. सदर कार्यातून अनेकानेक लोकांपर्यंत सामाजिक कार्यातील प्रेरणा अग्रेसीत होताना दिसत आहे.

      सदर नालीसफाई च्या कार्यात गावातील होतकरू युवक, महिलावर्ग तसेच समवयस्क पुरुष अग्रक्रमाने सहभागी होऊन श्रमदानातून नालीसफाई चे काम उत्साहाने करताना दिसुन येत आहेत.