आदिवासी गावातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ प.स.सदस्य व माजी उपसभापती चेतन देशमुख याचे नेतृत्वात पारशिवनी तहसीलदारांना भेटले.

 

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 

पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील येथील कोलितमारा, ढवलापुर, नरहर, बनेरा या गावातील येथील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात २०२२ पासून अद्यापही प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम जमा झालेली नसल्याने आज शुक्रवारला सकाळी ११ वाजता च्या दरम्यान आदिवासी गावातील शेतकरीचे शिष्टमंडळ पंचायत समितीचे सदस्य व माजी उपसभापती चेतन देशमुख याचे नेतृत्वात पारशिवणी तहसीलदार हनुमंतराव जगताप यांची भेट घेऊन या गंभीर मुद्द्यावर विस्वृत चर्चा करण्यात आली. 

       प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची या विषयाचे गांभीर्य ओळखून व आदिवासी शेतकऱ्यांचा विचार करून माननीय तहसीलदार हनुमंतराव जगताप यांनी व्यक्तिशः या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची विषयात लक्ष देऊन त्वरित निधी वाटप करण्याचे आश्वासन दिले. 

        प्रधानमंत्री किसान सन्मान निधी त्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होईल ही हमी दिली.यावेळी चेतन देशमुख इंद्रपाल गोरले,हंसराज सर्याम,मोहन उईके, रामकृष्णा इंनवाते,कृष्णा पंदराम, पंचम भलावी व इतर पिढीत ग्रामवासी उपस्थित होत..