वाघाच्या हल्ल्यात इसम ठार.. — सिंदवाही तालुक्यातील चिटकी मुरपार येथील घटना..

जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी

दखल न्यूज़ भारत

चंद्रपुर जिल्ह्यातंर्गत सिंदवाही तालुक्यातील चिटकी मुरपार या गावा लगत असलेल्या

जंगलात पट्टेदार वाघाने एका इसमाला ठार केले असल्याची घटना घडली.

     सविस्तर वृत असे की सिंदवाही तालुक्यातील नवेगांव (लोनखैरी) येथील मृत रघुनाथ नारायण गुरनुले वय 40 वर्ष रा.नवेगांव (लोन) हा आपल्या मित्रा सोबत शेतीसाठी लागणारे लाकुड़ आणण्यासाठी जंगलात

गेला असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने रघुनाथ वर हल्ला करुन ठार केले.

       या घटनेची माहिती वनविभाग व सिंदवाही पोलिसांना मिळताच वनविभागाचे अधिकारी हठवादे,सिंदवाही पोलिस स्टेशन चे पी.एस.आय सागर महल्ले व त्यांची चमु घटना स्थळी पोहचुन पंचनामा केला व मृतक रघुनाथचे शव शविच्छिदानासाठी सिंदवाही ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. 

      पुढील तपास सिंदवाहीचे ठानेदार तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस. आय.सागर महल्ले करीत आहे.