पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी अलंकापुरीची मोफत आरोग्य सेवा…

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात अनेक दिंड्यासोबत लाखो वारकरी सहभाग होत असतात याच पार्श्वभूमीवर अलंकापुरी प्रतिष्ठान यांच्या वतीने वारकऱ्यांना संपूर्ण वारी प्रवासात आरोग्य सेवा मोफत पुरवण्यात येणार आहे. 

     आळंदी ते पंढरपूर आरोग्य सेवा अलंकापुरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफाळकर आणि आळंदी देवस्थानचे प्र.व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, माजी नगरसेवक पांडुरंग वहीले, शामराव गिलबिले, नितीन साळुंके, सोमनाथ डवरी, नीलेश वीर, बंडुनाना काळे, आकाश जोशी, अविनाश गुळुंजकर, सचिन जगताप, योगेश सिंह, शंकर येळवंडे, काशिनाथ ठाकूर, विशाल येळवंडे, डॉ. चौधरी, डॉ.शुभांगी नरवडे, डॉ.विद्या कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

      या आरोग्य सेवेत वैद्यकीय पथक, तज्ञ डॉक्टर आणि रुग्णवाहिका यांचीही सज्जता सोबत ठेवण्यात आली आहे.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रवासात मुक्कामाच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अलंकापुरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे असे अलंकापुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण येळवंडे यांनी सांगितले आहे.