युवराज डोंगरे
उपसंपादक
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्ली ( CBSE) चा बोर्डाचा १०वी निकल नुकताच जाहीर झाला असुन त्यामध्ये जवाहर विद्यालय नवसारी,अमरावती येथे १० वी मध्ये शिकत असलेला इशांत नंदकिशोर ओलीवकर याने ९५.३३% गुण घेऊन नवोदय विद्यालय ,अमरावती येथुन प्रथम क्रमांक पटकाविला.
तो मुळचा तळवेल चांदुर बाजार जिल्हा अमरावती या छोट्याश्या गावचा रहीवाशी असुन त्याची आर्थीक परिस्थिती खुप हलाकीची आहे. त्याची आई मेघना ओलिवकर गृहणी असुन वडील शेतकरी आहे. इशांत ला कुठल्याही प्रकारे अतिरिक्त शिकवणी वर्ग नव्हते.त्याने घरापासुन दुर राहुन , स्व मेहणत व जिद्दीने अभ्यास करुन हे यश संपादन केले.त्यासाठी त्याचे कुंभार समाजाने मित्रपरिवारात,गाव परिसरात कौतूक होत आहे. इशांत ला भविष्यात आय आय टी इंजिनियर बनायचे आहे.
इशांत आपल्या यशाचे श्रेय नवोदय विद्यालयाचे प्राचार्य ,उप प्राचार्य, इतर शिक्षक वृंद ,वर्ग शिक्षक ,आई बाबा,मोठे बाबा, कुटुंबातील सर्व तसेच मित्रमंडळी यांना देत आहे.