साकोलीच्या नवजीवन (सीबीएसई) चे सुयश…

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

       साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल सीबीएसई जमनापुर/साकोली येथिल सीबीएसई बोर्ड परिक्षेचा निकाल उत्कृष्ठ लागला आहे. एकुण विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थी ९० टक्केपेक्षा जास्त, २५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी व १९ विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले. उत्कृष्ठ कामगिरीपैकी सानिया लोनारे ९७.४० टक्के घेऊन शाळेतून प्रथम, यश लांजेवार ९५ टक्के द्वितीय, याज्ञिका गिऱ्हेपुंजे ९४.४० टक्के तृतीय, अपुर्वा गजापूरे ९१.८० टक्के, मोहिता मारवाडे व पार्थ चांदेवार ९१.४० टक्के आलेत.

           यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, वृंदाताई करंजेकर, डॉ. सोमदत्त करंजेकर, प्राचार्य मुज्जमिल सय्यद, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, सतिश गोटेफोडे व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन कौतुक केले.