दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
चिमूर तालुक्यात सर्व प्रकारच्या अवैध व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले असून,अशा अवैध व्यावसायिकांना रान मोकळे झाले असल्याचे सर्वत्र चित्र आहे.
चिमूर तालुकातंर्गत मौजा चिमूर,नेरी,जांभुळघाट,मोटेगाव,नवतळा,डोमा,शंकरपूर,भिसी व इतर ठिकाणी सट्टा व्यवसाय जोरात सुरु असून दररोज करोडो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा जनमानसात आहे.
चिमूर तालुक्यात सट्टा,व्यवसाय जागोजागी बिनधास्त सुरु असल्यामुळे अनेक कुटुंबे बरबाद झाली असल्याचे पुढे आले आहे.
भर रस्त्यावर सट्टापट्टी कापत असल्याने व्यवसायीका(मालक) बरोबर सट्टापट्टी कापणारे कमिशनधारक मालामाल होत असल्याची खमंग चर्चा जिकडे-तिकडे आहे.