सुजाण नागरिकांनो मतदानाला जातांना हे विसरू नका…..

      “तुम्ही ज्या उमेदवाराला मत देणार आहात मग ते मुजोर EVM वर बटण दाबून असो किंवा…..मतपत्रिकेवर शिक्का मारून असो……!

      हा मताचा अधिकार वापरत असतांना ज्यांना ते देणार आहात त्या संविधानविरोधी शक्तीला नष्ट करण्याचाच विचार करावा….

        कारण गेल्या अनेक वर्षांपासून या संविधानविरोधी शक्तीने संविधानाला गोगलगाईच्या गतीने संपविण्याचा प्रयत्न केला………

         परंतू ,गेल्या 2014 पासून या शक्तीने कोरोनाच्या गतीने संविधानाला संपविण्याचा घाट घातला आहे….!

       याचे उत्तम उदाहरण म्हणजे 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायमूर्तिनी मिडीयासमोर येऊन जे स्टेटमेंट देऊन देशात खळबळ माजविली.जी आजपर्यंत देशाच्याच काय जगाच्या 75 वर्षाच्या इतिहासात न भूतो न भविष्यती दुर्घटना घडली आहे…!

         आम्हाला ( भारतीय जनतेला ) हजारो वर्षाच्या गुलामीची सवय झाल्यामुळे या दुर्घटनेचे महत्व आम्हाला वाटत नाही……!

           कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला ( भारतीय जनतेला ) आंतरराष्ट्रीय दर्जाचे, विज्ञानवादी + विवेकवादी = मानवतावादी म्हणजेच लोकशाहीवादी बनविण्यासाठी प्रदान केलेले……”भारताचे संविधान,हे विश्वाला आदर्श असलेले संविधान आहे,हे भारताशिवाय जगाला समजले म्हणूनच तर इतर देशात विशेषतः अमेरिकेने……”The Symbol Of Knowledge Of World.,मान्य केल्यामुळेच……

जगात उंची याच संविधानाची वाढलेली आहे.

        दुसरे कारण म्हणजे 10 डिसेंबर 1948 लाच जेंव्हा जागतिक मानवी हक्काचा जाहीरनामा युनोनी घोषित केला,त्यातील 30 ही कलमे भारताच्या संविधानातून अप्रत्यक्षरित्या अधोरेखित झालेली आहेत……

      तेंव्हाच युनोनी या संविधानाला आंतरराष्ट्रीय दर्जा देऊन सन्मान वाढविला आहे….. 

       परंतू ,अशा महान संविधानाला प्रथम हादरा देण्याचे काम येथील संविधानविरोधी शक्तीने केल्यामुळेच विशेषतः ज्या संविधानाचे रक्षण करण्याचे आद्यकर्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे आहे…..

       त्याच न्यायालयातील 4 न्यायमूर्तिनी मीडियासमोर येउन जी खदखद व उदविग्नता व्यक्त केली आणि दुसऱ्या दिवशी ती लगेच हवेतच विरून गेली…

  ही दुर्घटना म्हणजे भविष्यात येणाऱ्या अनेक संकटांची नांदी ठरली…..!

      ही दुर्घटना हवेतच विरणे म्हणजे वादळापूर्वीची शांतता ठरली….!!!

      या दुर्घटनानंतर ज्या ज्या दुर्घटना या देशात घडल्या त्या लक्षात घेता आज आपण भयानक अशा संकटातून आम्ही जात आहोत,याचे गांभीर्य अजूनही आपल्याला नाही…..

 याचे आश्चर्य वाटण्याचे कारणही नाही कारण आम्हाला संविधानविरोधी शक्तीच्या अन्याय सहन करण्याची सवय होऊन बसलेली आहे…………!!!!!

       EVM ला देशातून प्रचंड विरोध असतांना,सर्वोच्च न्यायालयातील वकील यात सहभागी असतांना,देशभरातील इतर न्यायालयातील वकील यात सहभागी असतांना,जनता रस्त्यावर उपोषणाद्वारे,मोर्च्याद्वारे, निदर्शनाद्वारे सहभागी असतांना,एवढेच काय सर्वोच्च न्यायालयाने ( निवडणूक आयोगाला )निर्देश दिलेले असतांना सुद्धा,याची गांभीर्याने दखल न घेण्याचा अट्टाहास या निवडणूक आयोगाचा असणे म्हणजे…..त्या दुर्घटनेचे सर्वात मोठे दुष्परिणाम होय….!

         त्याचप्रमाणे अगदी कालपरवाच सर्वोच्च न्यायालयाच्या 4 माजी न्यायमूर्तिनी म्हणजेच आदरणीय. न्या.दीपक वर्मा,आदरणीय.न्या. कृष्ण मुरारी,आदरणीय.न्या. दिनेश माहेश्वरी,आणि आदरणीय. न्या.एम.आर.शहा यांनी स्वाक्षऱ्या करून तसेच देशातील इतर राज्यांच्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असलेले आदरणीय.न्या.पी. कोहली,आदरणीय न्या.एस. एम. सोनी,आदरणीय.न्या.अंबादास जोशी,आदरणीय.न्या.एस.एन. धिंगरा,आदरणीय.न्या.आर.के. गौबा,आदरणीय.न्या.अजित भारीहोके,आदरणीय.न्या. ग्यानप्रकाश मित्तल,आदरणीय. न्या.राघवेंद्रसिंग राठोड,आदरणीय.न्या.आर.के.मेराटिया,आदरणीय.न्या.करमचंद पुरी,आदरणीय.राकेश सक्सेना,आदरणीय.न्या.नरेंद्र कुमार,आदरणीय.न्या.राजेश कुमार,आदरणीय.न्या.एस.एन. श्रीवास्तव,आदरणीय.न्या.राजीव लोचन आणि आदरणीय.न्या. पी. एन. रवींद्रन आणि त्याचबरोबर लोकपाल सिंग.

      या सर्व न्यायमूर्तिनी CJI (Chief Justic e Of India) यांना पत्रातून कळविले की, “न्याय व्यवस्थेला कमकुवत करण्याचा काहींचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे.”

       असे पत्र लिहिणे म्हणजे पुढील येणाऱ्या भूकंपाची नांदी ठरू नये.

     यासाठीच मतदान आम्ही ज्यांना करणार आहोत अशा संविधानविरोधी शक्तीचे हात बळकट करण्यासाठी नव्हे तर हात छाटून टाकण्यासाठीच मतदान आपल्या हृदयातील सदसदविवेक बुद्धीला जागृत करूनच केले पाहिजे……..

***

           आवाहनकर्ता..

           अनंत केरबाजी भवरे 

(संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689)