पिंपरी बुद्रुक येथील बी के बी एन राज्य मार्गाने शंभू महादेवाच्या कावड्या अहमनगर, सोलापूर, उस्मानाबाद,बिड, कर्नाटक या जिल्ह्यातून हजारो भाविक शिखर शिंगणापूर कडे पाई वारीने प्रस्थान 

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

       सालाबाद प्रमाणे शिखर शिंगणापूर महादेवाची यात्रा ही गुढीपाडव्यापासून चालू होत आसते. यात्रे निमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून शंभू महादेवाच्या कवड्या घेऊन भाविक भक्त शंभू महादेवाकडे जातात. हर हर महादेव आशी गर्जनाने हलगी तासांच्या आवाजात नाचत व वाद्य वाजवत बी के बी एन राज्य मार्गाने जाऊ लागले आहेत.

        शिखर शिंगणापूर कडे हजारोच्या संख्येने भाविक आपल्या महादेवाची कावड घेऊन पाई वारी करु लागलेले आहेत. अनेक गावोगावी मुक्काम पर मुक्काम करत महाप्रसाद नाष्टा चहापाणी लिंबु सरबदाचा आस्वाद घेत भाविक पुढील मुक्कामासाठी मार्गाला जाऊ लागले.

          नरसिंहपुर, टणु ,गिरवी, पिंपरी बुद्रुक ,गणेशवाडी,बावडा, सराटी,गोंदी , ओझरे ,आदी गावातून शेकडो अन्नदाते या शंभू महादेवाच्या पायी जाणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करतात ऐंन उन्हाळ्यात पण भाविक शंभू महादेवाची कावड घेऊन हर हर महादेव आसी महादेवाच्या नावाने गर्जना करीत शिखर शिंगणापूरला पायी वारीने बी के बी एन राज्य मार्गाने पिंपरी बुद्रुक मार्गे जाऊ लागलेली आहेत.