दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
पुणे : डॉ.पी.ए. इनामदार युनिव्हर्सिटी ,महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, ‘अवामी महाज ‘ सामाजिक संघटना आणि आझम कॅम्पस परिवारातील संलग्न संस्थांच्या वतीने शनिवार ,दिनांक १५ एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ पोलिस अधिकारी, सर्वधर्मीय बांधवांची, शीख-बौद्ध-मुस्लीम धर्मगुरूंची तसेच सर्वपक्षीय नेते,सामाजिक कार्यकर्त्याची मोठी उपस्थिती होती.
पुण्याचे सह पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे प्रमुख आणि इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांनी स्वागत केले.आबेदा इनामदार, अतिरिक्त आयुक्त राजेश डहाळे, माजी मंत्री रमेश बागवे, अतिरिक्त आयुक्त राज महमद राजे, उपायुक्त स्मार्तना पाटील, अॅड.अयुब शेख, विरेंद्र किराड, अभय छाजेड, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे, माजी आमदार मोहन जोशी, विनोद मथुरावाला, रफीक शेख, कमल व्यवहारे, अविनाश बागवे, राहुल डंबाळे, अली इनामदार, शाहीद इनामदार, पोलिस निरीक्षक तटकरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. इक्बाल अन्सारी यांनी सूत्रसंचालन केले.असीफ अयुब शेख यांनी मानले.
डॉ.पी.ए.इनामदार म्हणाले, आपण राष्ट्रीय एकात्मता, सद्भावनांच्या देशात राहतो. पुणे तर एकात्मतेचे, शांततेचे प्रतिक आहे. येथे बंधूभाव, सद्भाव टिकून ठेऊया. पोलिसांचे योगदान महत्वाचे असून त्यांनाही सर्व सणांमध्ये सामावून घेतले पाहिजे ‘.
संदीप कर्णिक म्हणाले, रोजा इफ्तार सारखे कार्यक्रम हे राष्ट्रीय एकात्मतेचे व्यासपीठ आहे. सर्वधर्मीयांनी सर्वांच्या सणांना एकत्र येत राहावे. प्रेम, बंधूभाव टिकून राहावा.आझम कॅम्पसचे त्यासाठीचे प्रयत्न उपयुक्त आहेत. ‘
आझम कॅम्पस मधील फंक्शन ग्राउंड वर सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम झाला. रमजान महिन्यातील उपवास रोजा सोडण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.