
दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
अन्याय,अत्याचार,शोषण व दडपशाही धोरणाचा कडाडून विरोध करण्यासाठी आणि नागरिकांच्या संरक्षणार्थ लोकशाहीला वाचविण्यासाठी,”वज्रमूठ, महाविकास आघाडीची विराट जाहीर सभा आज नागपुराला होणार आहे.
या सभेला काॅंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना उद्धवराव ठाकरे यांच्या पक्षातील लाखो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भरगच्च उपस्थिती राहणार आहे.
सदर सभेला काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी महशुल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार,विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे,माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,शिवसेना नेते भास्कर जाधव,उपनेत्या सुषमा अंधारे आणि तिन्ही पक्षाचे गणमान्य लोकनेते सभेला उपस्थित राहणार आहेत.
सभेचे स्थळ दर्शन काॅलनी मैदान,केडीके काॅलेज समोर नंदनवन नागपूर असे आहे.महाविकास आघाडीच्या सभेला सायंकाळी ५ ते ७ वाजताच्या सुमारास प्रारंभ होण्याची शक्यता आहे.