
दखल न्युज भारत चिखलदरा
अबोदनगो चव्हाण
चिखलदरा :-
चिखलदरा तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेतून गुरांचा गोठा बांधण्याचे काम सुरु असून ही सर्व प्रक्रिया राबविण्याचे काम तांत्रिक अधिकाऱ्या मार्फत केल्या जात आहे.
पण या योजनातंर्गत संपूर्ण कागदाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांकडून दहा हजार रुपये द्या आणि कोठा घ्या अशी पठाणी वसुली केल्या जात आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी व गुरांना राहण्यासाठी चांगला गोठा असावा या उदेशाने शरद पवार ग्राम समृद्धी योजनेतून एका युनिट गोठ्यासाठी 80 हजार दोन गोठ्यासाठी दीड लाख व तीन गोठ्यासाठी दोन लाख तीस हजाराचा निधी मिळतो आहे.
मात्र,या योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासल्या जात असून योजनेत काम करणाऱ्या तांत्रिक अधिकाऱ्याकडून दहा हजार रुपये द्या व कोठा घ्या असे गुपित फर्मान सोडल्या गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गोठ्याच्या योजनेपासून आता दूर होण्याची वेळ आलेली आहे.
असाच एक प्रकार चिखली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाटकाहू गावातील लाभार्थ्यांसोबत घडला असून तेथील चक्क गोठ्याचा बिल काढण्या करिता दहा हजार रुपये घेतले असून 12 महिने होऊन सुध्दा आज पर्यंत बिल मिळाले नसल्याची तक्रार गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.
पाटकहू येथील शेतकऱ्यांकडून तांत्रिक अधिकाऱ्याने गोठ्याच्या बिल काढण्याकरिता पैसे घेतल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. मी चौकशी करतो व दोषी आढळल्यास कार्यवाही करेल असे चिखलदरा पसचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी सांगितले.
आमच्या गावाला असणाऱ्या तांत्रिक अधिकाऱ्याने गोठ्याच्या बिल काढण्याकरिता दहा हजार रुपये घेतले असून बारा महिने होऊनसुद्धा गोठ्याचे बिल मिळाले नाही.त्याकरिता गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार पाटकहू येथील शेतकरी प्रेमलाल मेंटकर व सीताराम कस्तुरे यांनी केली आहे.