गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला केले जेरबंद…‌ — २१ हजार ४५० रुपयांचा गांजासह मुद्देमाल जप्त,आरोपी नागपूर येथील रहिवासी..‌. — चिमूर पोलिसांची समाजहितोपयोगी अशीच महत्त्वपूर्ण कारवाई..‌

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये

      नागरिकांना लत लावून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा गांजा (गुंगीजन्य पदार्थ) विकने हा प्रकारच समाज मनाला न पटणारा आहे.परंतु अलिकडच्या काळात गांजा पिणाऱ्याची संख्या वाढत असल्याने आणि कमी रुपयात त्यांची नशा पुर्ण होत असल्याने गुंगीजन्य गांजा पिणाऱ्यांची संख्या जिकडे तिकडे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

        तद्वतच गांजाचा झुरका ओढणाऱ्यांची संख्या ग्रामीण भागात वाढत असल्याने गांजाची मागणी सुध्दा ग्रामीण भागात वाढत असल्याचे चित्र चिमूर बसस्थानक येथील गांजा जप्त घटनाक्रमावरुन लक्षात येते आहे.

        चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर पोलिसांनी गोपनीय माहीतीच्या आधारे सापळा रचून दिनांक. १५/०३/२०२५ रोजी रात्री ०९:३० ते ११:३० वा. दरम्यान आरोपी ईसम नामे मोहम्मद वहद अब्दुल रहिम शेख,वय-४५ वर्षे, रा.गोविंद नगर मोमिनपुरा, नागपुर यांची झडती घेतली व त्यांच्या कडून गांजा जप्त केला.

          आरोपी मोहम्मद वहद अब्दुल रहीम शेख हे,हल्ली मु.पिली नदी,जोगी अरविंद नगर नाल्या जवळ नागपुर येथे राहतात.

     सदर आरोपींची शासकिय पंच व मापारी,फोटोग्राफर यांचे समक्ष मौजा-चिमुर नविन बस स्थानक,०२ कि.मी.पुर्वेस झडती धेतली असता,त्यांचे ताब्यातुन २ किलो ४६ ग्रॅम गांजा आढळून आला.त्याची किंमत कि. २० हजार रुपये आहे.तसेच गांजा ठेवण्यासाठी कथ्या रंगाची बंग किंमत २०० रुपये,खिशामध्ये नगदी २५० रुपये आढळून आले.

         याचबरोबर एक ACE कंपणीचा आकाशी निळ्या रंगाचा मोबाईल किंमत १ हजार रुपये असा एकुण २१ हजार ४५०/- रुपयांचा माल आरोपीकडे मिळुन आला.

        सरकार तर्फे तक्रारदार यांचे तक्रारीवरुन चिमूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला.अप‌.क्र. १११/२०२५. असून कलम ८ (क),२० (ब) (ii), (A) गुंगिकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS ACT) नुसार कारवाई करून गांजा तस्करीचे प्रकरण तपासात घेतले आहे आणि आरोपीस अटक केली आहे.

          सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात सपोनी निशांत फुलेकर,सपोनि मल्हारी ताळीकोटे,पोहवा विलास राधोबाजी निमगडे २१८८, पो.स्टे.चिमुर,यांनी केली व पुढील तपासाला सुरुवात झाली.

        गांजा विकणाऱ्या इसमाला अटक करुन चिमूर पोलिसांनी समाजहितोपयोगी असे महत्त्वपूर्ण काम केले आहे हे प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे.

वृत्त संकलन….

उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक..

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..‌‌