रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी वर्धा/यवतमाळ
वर्धा: जिल्हातील रोहणा बैंक ऑफ इंडिया येथे सेवानिवृत्त शिक्षक रामदास आसटकर हे आपल्या नातवासोबत गेले होते. त्या दिवशी त्यांनी बँक ऑफ इंडियातून ३० हजार रुपये काढले. बँकेतून काढलेली रक्कम काढून ते सरळ वर्धेला निघून आले. रक्कम जास्त आल्याचे त्यांच्या नातवाच्या लक्षात आले. बँकेच्या सुट्ट्यांनंतर रोहणा येथील बँकेत स्वतः जात त्यांनी रक्कम परत केली.
रोहणा येथील बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त शिक्षक रामदास आसटकर यांनी काही दिवसांपूवी ३० हजार रुपयांची रक्कम काढली होती. त्यानंतर ते वर्धा येथे परत गेले होते. वर्धेत परतल्यानंतर आसटकर यांचा नातू अथर्वने रक्कम मोजली असता यात १० हजार रुपये जास्त असल्याचे दिसून आले.
बँकेकडून काही निरोप येईल म्हणून त्यांनी दोन-तीन दिवस वाट पाहिली. परंतु तीन दिवस बँकेला असलेल्या सुट्ट्यांमुळे बँकेकडून काहीही निरोप आला नाही. त्यामुळे १२ मार्चला अथर्व आणि राजेंद्र आसटकर यांनी स्वतः बँकेत येऊन व्यवस्थापक विशाल प्रल्हाद मुजमुले यांना मिळालेली रक्कम परत केली.