“दवाखाना आपल्या दारी” योजने अंतर्गत नेहा प्राथमिक शाळा वाघधरे वाडी कन्हान येथे आरोग्य शिबिर संपन्न .

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी:- दवाखाना आपल्या दारी योजने अंतर्गत आरोग्य वाहिनी व मोबईल हेल्थ टीमच्या सहाय्याने पारशिवनी तालुका तील ग्रामीण भागातील नागरिकाना सर्व समावेशक आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या हेतूने शासनाने सदर उपक्रम आयोजित केला आहे. 

       या अर्तगत तालुका तील नेहा प्राथमिक शाळा वाघधरेवाडी कन्हान येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे आयोजित करण्यात आला.

       सदर शिबिरात प्रामुख्याने श्रीमती करुणाताई आष्टणकर अध्यक्ष नगर परिषद कन्हान पिपरी,राजेंद्रजी शेंदरे नगरसेवक,श्रीमती अनीताताई पाटील नगरसेविका,श्रीमती सुषमाताई चोपकर नगरसेविका, प्रेमभाऊ रोडेकर नागपूर उपजिल्हा प्रमुख शिवसेना,पुरुषोत्तमजी येलेकार विधानसभा प्रमुख शिवसेना,महेंद्रजी भुरे तालुका प्रमुख शिवसेना,श्री.चिंटूजी वाकुडकर,समशेरजी पुरोवले,गणेशजी भालेकर,शशिकांत दारोडे,रामलखनजी पात्रे,अर्जुनजी पात्रे,श्री.गणेशजी खोबरागडे मुख्याध्यापक प्राथमिक शाळा वाघधरेवाडी कन्हान हे प्रामुख्याने उपस्थित होते.

    सदर शिबिरात उच्च रक्तदाब तपासणी,मधुमेह तपासणी,तोंडाचा,गर्भमुखाचा, आणि स्तनाचा कर्करोग तपासणी,सिकलसेल तपासणी,किशोरवयीन लाभार्थी यांना सेवा देणे,कृष्टरोग आणि क्षयरोग तपासणी,मोतीबिंदू तपासणी,कर्णबधिर तपासणी,आयुष्यमान भारत व आभा कार्ड काढणे इत्यादि सेवा देण्यात आली.

      सदर शिबिरात 30 लाभार्थी यांनी आयुष्यमान भारत कार्ड काढले नगर परिषद कन्हान पिपरी आयुष्यमान भारत टीम यांनी सुद्धा आयुष्यमान भारत कार्ड काढले सदर शिबिरात 297 लाभार्थी यांनी लाभ घेतला.

       शिबिरात प्रास्ताविक डॉ. तेजस्विनी गोतमारे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान यांनी केले तर अध्यक्षीय मार्गदर्शन श्रीमती करुणाताई आष्टणकर अध्यक्ष नगर परिषद कन्हान पिपरी यांनी केले.

       तसेच संचालन व आभार प्रदर्शन श्री.हंसराज ढोके आरोग्य सहाय्यक यांनी मानले. 

      शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ.तेजस्विनी गोतमारे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान,डॉ.आशीष सदावर्ते समुदाय आरोग्य अधिकारी,डॉ. जयश्री मेश्राम समुदाय आरोग्य अधिकारी,श्री.हंसराज ढोके आरोग्य सहाय्यक,श्री.अथर्व बंड, श्री.विलास सहारे,हरीदास पराते आरोग्य सेवक,महेंद्र सांगोडे,आशुतोष नखाते,निकिता बंड संगणक परिचालक,श्रीमती नितू गायधणे,कविता नाईक आरोग्य सेविका आणि इतरांनी प्रयत्न केले.