
पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- दि.१५ फेब्रुवारी २०२५ ला व्हॉईस ऑफ मिडीया देसाईगंज तालुका कार्यकारिणी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष व्यंकटेश दुहुमवार यांच्या सुचनेवरून, जिल्हा सचिव विलास ढोरे यांच्या उपस्थितीत गठीत करण्यात आली. यात व्हॉईस ऑफ मिडीया देसाईगंज तालुका अध्यक्षपदावर राजरतन मेश्राम यांची तर सचिव पदी इलियास खान पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष संदीप काळे व प्रदेश अध्यक्ष अनिल मस्के यांच्या सुचनेनुसार व गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यंकटेश दुडूमवार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील १२ हि तालुक्याची नव्याने कार्यकारिणी बनविण्याचे काम सुरू असून प्रथमच चामोर्शी तालुका कार्यकारिणी गठीत होऊन देसाईगंज तालुक्याची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
अध्यक्षपदी राजरतन मेश्राम व सचिव पदी इलियास खान पठाण यांची निवड होताच लगेच अध्यक्ष सचिवांनी आपली सहकारी टिमची कार्यकारिणी सुद्धा त्याच बैठकीत निवड केली. यात व्हॉईस ऑफ मिडीया देसाईगंज तालुका कार्याध्यक्षपदावर प्रा. दिलीप कहरके यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी अरूण राजगीरे, संघटक प्रकाशचंद्र दुबे, सहसचिव रविंद्र कुथे, कोषाध्यक्ष महेश सचदेव, कार्यवाहक अरविंद घुटके, प्रसिद्धी प्रमुख पंकज चहांदे तर या सर्वांना मार्गदर्शक म्हणून जेष्ट पत्रकार से. नि. मुख्याध्यापक शामराव बारई (गुरुजी) तर सदस्य म्हणून शैलेश पोटवार, हेमंत दुनेदार, नसिर जुम्मन शेख, अ. वहीद शेख, घनश्याम कोकाडे आदींची निवड करण्यात आली. यावेळी बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्याचे जिल्हा सचिव विलास ढोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, व संघटनेच्या पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. तर पत्रकारांच्या समस्या व येणाऱ्या अडचणी तसेच खास करून पत्रकार भवना करीता प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष/सचिवांनी दिली.