चिमुर तालुक्यातील कर्मचारी व अधीकारी व्हाॅलीबाल संघाने साधली विजयाची हॅटट्रिक…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

जिल्हा स्तरीय अधिकारी/कर्मचारी क्रिडा स्पर्धा चंद्रपूर येथे ८ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पार पडल्या. यामध्ये १५ तालुक्यातील कर्मचारी / अधिकारी यांनी भाग घेतला होता.

          त्यात चिमुर तालुक्यातील कर्मचारी व अधिकारी यांनी सर्व स्पर्धेत सहभागी झाले होते.त्यामध्ये चिमुर तालुक्यातील व्हाॅलीबाल संघाने विजयाची हॅटट्रिक साधत सतत तीन वर्षे अजेय राहत विजय नोंदविला आहे .

          तसेच कॅरम स्पर्धा मध्ये सुध्दा हॅटट्रिक साधली आहे. बॅडमिंटन स्पर्धा मध्ये विजय नोंदविला आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्यात समुह नुत्य स्पर्धा मध्ये घणघणीत द्वितीय क्रमांक मिळविला.

           आणि सर्व खेळाडूंने उत्स्फूर्त सहभाग घेतला. नितीनजी फुलझेले साहेब यांनी तिन्ही दिवस उपस्थित राहुन खेळाडू चे मनोधैर्य वाढविले होते.

         यामध्ये श्री. रूपेश कांबळे सर ग.शि.अ, विशाल बोधाने वि.अ स्वन्पील खांडेकर वि.अ. यांनी प्रत्यक्ष राहुन मनोधैर्य वाढविणारे होते.त्यात विशेष सर्व खेळाडू भाग घेतला.अभिनंदनिय बाब म्हणजे बाळकृष्ण नंदनवार, देवेंद्र पराते , गोविंद गोहणे , मधुकर नन्नावरे, आणि रविंद्र नान्हे ओंकार ठेंगणे यांचा विभागीय व्हाॅलीबाल स्पर्धेत निवड झाली.

           त्यांचा अभिनंदन करून आदरणीय गटविकास अधिकारी नितीनजी फुलझले यांनी सत्कार समारंभाचा कार्यक्रम करून खेळाडूचा सत्कार करून खेळाडूचा मनोद्वारे वाढल आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यामध्ये बाळू नंदनवार गोविंद गोहने देवेंद्र पराते कल्पना महाकाळकर परशुराम शेळके बल्लाळेश्वर बारेकर , मधुकरजी नन्नावरे , फाल्गुन हेडाऊ , जनार्दन केदार सर शितल सरलावर मॅडम , धरती शेंडे मॅडम , वर्षा निमजे मॅडम आशिष भिमटे , गुंजाळ झिंगरे , ओंकार ठेगणे , नेहा ढाले , चेतना मॅडम , मनीषा भावे यांनी विशेष योगदान दिले.