
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : भारतीय सोनार समाज शाखा साकोली च्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज विठ्ठल रखुमाई मंदिर नवीन बस स्टॉप समोर संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सुवर्ण समाजातील जेष्ठ मार्गदर्शक चंद्रहास्य भुजाडे यांनी पूजा अर्चना करून समस्त सुवर्णकार बांधवांसोबत आरती केली.
नंतर सुवर्णकार बांधवांनी साकोली शहरातून महाराजांची मिरवणूक काढुन सदर कार्यक्रम स्थळी महिलांसाठी व मुलांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. यात चित्रकला स्पर्धा, वेशभूषा, वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आले.
तसेच सुवर्णकार समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व ज्येष्ठ नागरिक चंद्रहास्य भुजाडे, सदाशिव मस्के, लेखीराम हर्षे, रेवराम गजापुरे, रमेश कावळे यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून मनोहर मस्के तर प्रमुख अतिथी माजी जि. प. समाज कल्याण सभापती मदन रामटेके,भाजपा जिल्हा सचिव भोजराम कापगते, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष अशोक कापगते, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल हरमारे, भाजपा शहराध्यक्ष नितीन खेडीकर, माजी नगरसेवक मनीष कापगते, हेमंत भारद्वाज ,शहर सचिव डाकराम कापगते ,मुरलीधर गजापुरे, सुरेश गजापुरे , रमेश ढोमणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी व्यंकटेश येवले, दिनेश गजापुरे, मयूर गजापुरे ,प्रकाश रोकडे ,अशोक भरणे ,चंद्रशेखर पोगडे, किशोर पोगडे,दिलीप निनावे, अजय भजे, गुणवंत गजापुरे ,शैलेश ढोमणे, राजेंद्र हर्षे, चुळाराम येवले, सुरज डुंभरे,अमेय डुंभरे , राजेश ढोमणे, मोंटू गजापुरे, मनोज भुजाडे, सदाशिव मस्के, सुरेश हर्षे,भास्कर येवले ,हरीश पोगडे, भारती गजापुरे ,बबीता भजे, अनिता पोगडे, माधुरी ढोमणे, अनिता पोगडे,रेखा रेवाराम गजापुरे, रेखा दिनेश राजापुरे, मीना येवले,योगिता भुजाडे, सुरभी डुंबरे यांच्यासह संपूर्ण सुवर्णकार समाज बांधवांनी सहकार्य केले तसेच सूत्रसंचालन सुरेश हर्षे यांनी केले.