
ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर आजाद समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष सांसद भाई चंद्रशेखर आजाद विशेष नजर ठेवत तयारीला लागण्याचे आदेश दिले असून प्रदेश कमिटी ला महाराष्ट्र दौरा करून संघटन पुनर्बांधणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात प्रमुख पदाधिकारी बैठकीस महाराष्ट्राचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी रुपेशजी बागेश्वर, प्रदेश महासचिव डॉ. जे. बी. रामटेके, रुपचंद टोपले, वरिष्ट नेते पलटणकर उपस्थित होते.
सदर बैठकीत पक्षाची पुढील रणनीती, भाई चंद्रशेखर आजाद यांचा महाराष्ट्र दौरा आणि जिल्हा संघटन बांधणी यावर सविस्तर मार्गदर्शन प्रभारी बागेश्वर यांनी केले व ज्या पद्धतीने भाई चंद्रशेखर आजाद रस्त्यावर आणि संसदेत सुद्धा बहुजनांचा आवाज बुलंद करतात त्यावरून बाबासाहेब व कांशीरामजी यांचा मंदावस्थेत आलेला राजकीय चळवळीचा रथ सांसद ऍड. भाई चंद्रशेखर आजाद शिवाय कुणी पुढे नेऊ शकत नाही असे चित्र दिसते. आणि त्यामुळे देशभरात पक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे व युवा पिढी पक्षात येत असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी पक्षाचा जिल्हातील काम पाहुण पक्षाला अधिक गतिमान करण्यासाठी विदर्भ पूर्व प्रदेश सचिव पदी धर्मानंद मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली तर जिल्हाध्यक्ष पदी राज बनसोड यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली. विदर्भात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी 23 फेब्रुवारी रोजी नागपूरला महाराष्ट्र प्रदेश स्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला असून त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल फुकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
धर्मानंद मेश्राम व राज बनसोड यांच्यासह बैठकीला महासचिव पुरुषोत्तम रामटेके, जिल्हा संघटक हंसराज उराडे, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, जिल्हा सचिव प्रकाश बनसोड, युवा आघाडी अध्यक्ष विवेक खोब्रागडे, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष दिनेश देशमुख,प्रभारी धनराज दामले, आरमोरी विधानसभा अध्यक्ष ऋषीं सहारे, महिला सचिव शोभा खोब्रागडे तथा विविध तालूका पदाधिकारी उपस्थित होते.