
पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी 2025 ला सायंकाळी 6 वाजता श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांना मान वंदना तसेच पालखी चे स्वागत करण्यात येणार आहे.
उपरोक्त शिवजयंती करिता शिवभक्तांनी जय्यत तयारी केली असून या अंतर्गत 20 फेब्रुवारी 2025 रोजी भगवा रंग फेम भजन गायिका शहनाज अख्तर यांचा कार्यक्रम पार पडणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज ग्रुप फवारा चौक देसाईगंज यांच्या वतीने गुरुवारला देसाईगंज क्रीडा संकुल मैदानावर सायंकाळी 6 वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये प्रेरणादायी वक्ते,लेखक व इतिहास अभ्यासक प्रा.नितीन बानूगडे पाटील यांचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम पार पडेल व त्या नंतर सुप्रसिद्ध भजन गायिका ‘भगवा रंग फेम’ शहनाज अख्तर यांचे भजन गीत कार्यक्रम पार पडेल.
सदर दोन्ही कार्यक्रमाचा देसाईगंज शहरासह परिसरातील शिवभक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन छत्रपती संभाजी महाराज ग्रुप फवारा चौक देसाईगंज यांनी केलेले आहे.