
चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधि भंडारा
लाखनी येथील समर्थ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी मोनिका दशरथ गायधने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेत भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गोंदिया येथे 9 फेब्रुवारी 2025 ला स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमात केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल व खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल वाणिज्य विभागाद्वारे सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. या प्रसंगी प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे बोलतांना म्हणाले की, आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा कुठेही सत्कार होत असेल तर तो फक्त त्या विद्यार्थ्यांचा सत्कार नसतो तो सत्कार आपल्या महाविद्यालयाचा असतो.
एक सत्कार मिळाल्यानंतर त्याचे लाभ किती जणांना मिळतात याचा विचार करावा असे सत्कार मिळविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे की माझी ही उंची वाढेल आणि मला मोठे करणाऱ्या व्यक्तींची ही उंची वाढेल असे विचार व्यक्त केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉ. सुनंदा देशपांडे, डॉ. सुरेश बनसपाल आणि डॉ. संगीता हाडगे, प्रा. गायधने यांनीही शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनंदा मॅडम यांनी केले तर संचालन आणि आभार डॉ. संगीता हाडगे यांनी केले.