बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे या दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघ येथे नागरिकांच्या भेटीसाठी उपस्थित राहणार आहेत तसेच तालुक्यातील युवकांच्या समवेत त्या संवाद साधणार आहे.
अंकिता पाटील ठाकरे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष होण्यापूर्वीपासूनच राजकारणात सक्रिय असून त्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटात संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात अधिक मतांनी देखील त्या निवडून आलेल्या आहेत.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टी पक्षाकडून लोकसभेचा उमेदवार म्हणून देखील त्यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे त्या अनुषंगाने शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून नक्कीच या बैठकीत काहीतरी होणार अशी आशा अनेकांना आहे.