बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
नवी दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.16) भेट घेतली.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी महासंघाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिलेबद्दल अमित शाह यांचे आभार व्यक्त करीत सत्कार केला. तसेच या भेटीत अमित शाह यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांची देशातील साखर उद्योगाच्या सद्यस्थितीत संदर्भात विविध विषयांवरती चर्चा झाली.
याप्रसंगी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे नूतन उपाध्यक्ष केतन भाई पटेल, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.