राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करायचे असेल तर बारावी बोर्डाच्या परीक्षेचे नियोजन करून जीवनात येणाऱ्या परीक्षेचे नियोजन करून आपले स्वप्न साकार करावे त्याकरिता विद्यार्थांनी जीवनात येणाऱ्या परीक्षेचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संस्था सदस्य इंजिनिअर गुणवंत फाये यांनी केले. ते कुरखेडा येथील श्रीराम कला , वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तथा संस्कार ज्यूनिअर कॉलेज कुरखेडा यांच्या वतीने आयोजित बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य एल. डब्लू .बडवाईक विशेष अतिथी संस्था सचिव दोषहरराव फाये संस्था सहसचिव प्रा.नागेश्वर फाये संस्था सदस्य इजी.गुणवंत फाये, शाळा समिती सदस्य चांगदेव भाऊ फाये, जूनियर विभाग प्रमुख प्राध्यापक प्रदीप पाटणकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक विनोद नागपूरकर उपस्थित होते.
यावेळी चांगदेव फाये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हंटले की विद्यार्थ्यांनी संघर्षमय जीवनात संघर्ष करुन जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर यश संपादन करून स्वतःचा आणि कॉलेज व आपल्या आई-वडिलांचा नावलौकिक करावा असे आवाहन केले तर संस्था सचिव दोषहरराव फाये यांनी तालुक्यामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थे तर्फे पाच हजार रुपयांचा पारितोषिक देवून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल असे आवाहन करून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य, एल, डब्लू बडवाईक व प्राध्यापक विनोद नागपूरकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बारावी वर्गातील तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दोन वर्षाच्या आठवणींना उजाळा दिला व शिक्षकांन बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
निरोप समारंभाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रदीप पाटणकर यांनी केले तर संचालन विद्यार्थी सौरभ बनसोड यांनी केले तर आभार विद्यार्थिनी प्राची सहारे हिने मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्युनिअर विभागातील प्राध्यापक प्राध्यापिका व अकरावी कला, वाणिज्य विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले .