दुचाकी पळवून नेणाऱ्या आरोपीस मध्य प्रदेशात पकडले, खल्लार पोलिसांनी केली तत्परतेने कारवाई…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

             चांदुर बाजार तालुक्यातील बेलमंडळी येथील दुचाकी पळवून नेणाऱ्या 26 वर्षीय आरोपीस खल्लार पोलिसांनी तत्परतेने मध्य प्रदेश येथून पकडले व आरोपीकडून पळवून नेलेली दुचाकी ताब्यात घेऊन त्यास अटक केली.

            गजानन बाळू ढोके(४३)रा मधलापूर ता.भातकुली यांच्याकडे थ्रेशर आहे. सध्या तूर काढण्याचा हंगाम सुरु असुन गजानन ढोके हे मधलापूर येथून मजुरासह साखरी, कसबेगव्हान परिसरात तूर काढण्यासाठी ये जा करतात घटनेच्या तीन दिवस अगोदर गजानन ढोके यांच्याकडील डिझेल संपल्याने ते खल्लार येथे दुचाकीने डिझेल आणण्यासाठी जात असतानाच त्यांना साखरी फाट्यावर आरोपीने लिफ्ट मागितली ढोके यांनी आरोपीस दुचाकीवर बसवून घेतले.याच दरम्यान मला कामाची गरज असून तुमच्याकडे काम असेल तर सांगा असे फिर्यादीस म्हटले फिर्यादीने आरोपीला त्यांच्या थ्रेशरवर काम दिले. तीन दिवस काम केल्यावर आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

           घटनेच्या दिवशी आरोपीने कामावरील मजुरांचे डबे आणतो असे सांगून फिर्यादीची दुचाकी क्र MH 27,BN 0435 दि 14 फेब्रुवारीला पळवून नेली.

         दुचाकी पळवून नेल्याचे लक्षात येताच फिर्यादीने खल्लार पोलिस स्टेशन गाठून घटनेची फिर्याद दाखल केली.

            खल्लार पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेऊन ठाणेदार मनोज सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर सिडाम,शरद डहाके, परेश श्रीराव यांनी तडकाफडकी तपास करुन आरोपी जयकुमार सुखदेव पानसे(26) यास मध्य प्रदेशातील आठनेर येथून ताब्यात घेऊन पळवून नेलेली दुचाकी खैरवाडा शेतशिवारातून ताब्यात घेतली आरोपीविरुध्द खल्लार ठाण्यात अप न 27/24 कलम 406,408 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली.