दिनेश बनकर
कार्यकारी संपादक
दखल नुज भारत ७८२२०८२२१६
तळा : तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळाचे नॅक मुल्यांकन करण्यासाठी नॅक बंगलोर कडून दिनांक १६ व १७ फेब्रुवारी,२०२३ रोजी नॅक पिअर टिमचे आगमन झाले आहे. या टिमचे चेअरमन म्हणून तुमकूर विद्यापीठाचे डीन डॉ परमशिवाय, मेंबर कोऑरडीनेटर म्हणून मद्रास विद्यापीठाच्या गिल रिसर्च सेंटरचे डायरेक्टर डॉ. व्यंकटेशन सुरेश तर मेंबर म्हणून डेहराडून येथील डि. ए. व्ही. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अजय सक्सेना उपस्थित होते. या टिमचे महाराष्ट्रयीन पद्धतीने संस्था पदाधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी यश क्षीरसागर या विद्यार्थ्यांने नॅक पिअर टिम मधील सदस्यांचे रांगोळीच्या माध्यमातून साकारलेले अप्रतिम छायाचित्राने नॅक पिअर टिम मधील मान्यवर सदस्यांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव करीत, लेझीम नृत्य सादर करत नॅक पिअर टिमचे स्वागत केले. यावेळी संस्था अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, संस्था सचिव श्री मंगेश देशमुख, महाविद्यालय विकास समिती चेअरमन डॉ श्रीनिवास वेदक, संस्था कार्यकारी मंडळाचे सदस्य, महाविद्यालय विकास समिती सदस्य यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवर सदस्यांचे स्वागत केले. प्रथम दिवसाच्या कार्यक्रमात प्राचार्य, आय क्यू सी, विविध विभाग यांच्या समवेत मान्यवर सदस्यांनी संवाद साधला व विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी सहविचार सभा घेऊन महाविद्यालयाच्या विकासाच्या दृष्टीने सर्वाची मते जाणून घेतली.