डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
अहेरी:- महाशिवरात्रीनिमित्त वेलगुर टोला येथील नमामि गंगामाता, नागमाता व समक्का सारक्का माता देवस्थान येथे जत्रेचे आयोजन करण्यात आले.जत्रेच्या पहिल्याच दिवशी माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी भेट देऊन दर्शन घेतले.
महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही वेलगुर टोला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.15 फेब्रुवारी पासून या जत्रेला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी महाशिवरात्री ची अंघोळ तर दुसऱ्या दिवशी महाप्रसाद व गोपाळकालाचे आयोजन करण्यात आले.याठिकाणी नेहमीच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.आता जत्रेचे आयोजन केल्याने भाविकांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे.
15 फेब्रुवारी रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी भेट देतात श्री प.पु.गंगामाता महाराज संस्थान श्री क्षेत्र वेलगुर टोला तर्फे ताईंचे स्वागत करण्यात आले.ताईंनी येथील विविध समक्का सारक्का व नागमाता मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच परमपूज्य गंगामाता महाराज संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.