चंद्रपूर येथे रिपाइंचे राज्यस्तरीय अधिवेशन….

प्रितम जनबंधु

     संपादक 

“संविधान बचाव, देश बचाव” जनजागृती अंतर्गत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ दुपारी १२:०० वाजता स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन होऊ घातले आहे. डॉ. राजेंद्र गवई राष्ट्रीय सरचिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली  सुबोध वाघमोडे, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश हे उद्घाटक असून गोपाल रायपूरे अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा हे स्वागताध्यक्ष आहे व मोरेश्वर चंदनखेडे आयोजक आहेत.

          रिपाइंचे जिल्हाध्यक्ष गोपालजी रायपूरे व जिल्हा कार्यकारिणीचे कोमल रामटेके, गुरूदास रामटेके आणि पाटील साहेब हे दिनांक १६ डिसेंबर २०२३ ला गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर येथे अधिवेशनाचा प्रचार आणि प्रसारासाठी आले असता ऐतिहासिक बुद्धभूमी येथे भेट दिली व रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक अशोककुमार उमरे यांच्याकडे चायपाणी केले.

          अशोककुमार उमरे यांनी याप्रसंगी उपस्थितांना बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सर्व भारतीयांनी सामील होण्यासाठी बाबासाहेबांनी आवाहन केलेले प्रकटपत्र भेट देण्यात आले.