द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी बाळासाहेब सुतार….   — जिल्ह्यामध्ये व राज्यामध्ये संघटना वाढविण्यासाठी माझे नेहमीच प्रयत्न रहातील राज्य सरचिटणीस बाळासाहेब सुतार यांचे मत..

    उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक…

        द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी बाळासाहेब बाबुराव सुतार यांची एक मताने निवड करण्यात आली. 

        पत्रकार दिनाचे औचित्य साधून द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांनी पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील पत्रकार बाळासाहेब सुतार यांची राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती केली.

           बाबासाहेब सुतार यांचे सामाजिक,राजकीय,क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व धडाडीचे पत्रकार म्हणून काम पाहिल्याने,द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य सर चिटणीस पदी बाळासाहेब सुतार यांची निवड केलेली आहे.

         बाळासाहेब सुतार हे गेली 20 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कार्यरत असून आतापर्यंत अनेक ठिकाणी पुरस्कार व सन्मान त्यांना मिळालेला आहे.तसेच त्यांनी पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा उपाध्यक्षपदीही अनेक वर्ष चांगल्या प्रकारे काम केलेले आहे,अखिल भारतीय सुतार समाज महासंघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदीही पाच वर्ष चांगल्या प्रकारे कामगिरी केलेली आहे.तसेच इंदापूर तालुका रुग्ण हक्क परिषदेत सध्या तालुका अध्यक्ष म्हणून कामही करीत आहेत.त्यांना अनेक ठिकाणचे पद व पुरस्काराही मिळालेले आहेत.. 

       तसेच बाळासाहेब सुतार हे सामाजिक क्षेत्रामध्ये गोरगरीब व गरजूवंत मजूर व कामगार विद्यालयातील विद्यार्थी यांचे ऍडमिशन मिळवून देणे,गरिबांचे प्रश्न मार्गी लावणे,शासकीय योजनेचा ग्रामस्थांना लाभ मिळवून देणे,पोलीस स्टेशन मधील एखाद्या ग्रामस्थाची अडचण असेल त्यांनाही मदत करणे यासारखी अनेक कामे करीत असून 

       नेहमीच बाळासाहेब सुतार यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे.

         प्रिंट मीडिया,इलेक्ट्रॉनिक मीडिया,सोशल मिडिया प्रतिनिधी म्हणून काम करतात.त्यांची द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी निवडी झाल्या बद्दल परिसरातून व महाराष्ट्र राज्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.