समाजसेवक सत्कार समारंभाचे चिमूरात आयोजन..

        रामदास ठुसे

 नागपूर विभागीय प्रतिनिधी.. 

         भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा चिमुरच्या वतीने दिनांक १८ जानेवारी २०२५ रोज शनिवारला सकाळी ११ वाजता लुंबिनी बौध्द विहार वडाळा (पैकु) येथे शाखेचे नुतनीकरण व समाजसेवकांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आलेला आहे.

          याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा चिमुरचे अध्यक्ष लहुजी पाटील,उद्घाटक जिल्हा शाखा चंद्रपुर (पुर्व) चे अध्यक्ष डॉ. राजपाल खोब्रागडे,मुख्य मार्गदर्शक म्हणुन केंद्रीय शिक्षक गडचिरोली तुलाराम राऊत,सेवानिवृत्त माजी सहसंचालक (शिक्षण) शिषीर घोनमोडे,जिल्हा शाखा चंद्रपुरचे सरचिटणीस लोमेश खोब्रागडे,जिल्हा उपाध्यक्ष रमेश मानकर,जिल्हा संघटक जर्नाधन खोब्रागडे,चिमुरच्या केंद्रीय शिक्षिका अँड.संजीवनी सातारडे, जिल्हा संघटक सोनाली गजभिये आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

         यावेळी उपस्थित मान्यवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या धार्मिक संस्थेची म्हणजेच भारतीय बौध्द महासभेचे कार्य गतीमान करणे,बौध्द धम्माचा प्रचार व प्रसार करणे,विविधि प्रकारचे शिबिर राबवुन मानव जातीला सुसंस्कृत बनविणे,व्यसनमुक्त उपक्रम राबविणे,”बौध्द बनो,बौध्द लिखो..अभियान राबविणे,धम्मक्रांती गतीमान करणे,बौध्द संस्कृतीच्या वाढीसाठी योग्य प्रयत्न करणे,अंधश्रध्दा,कर्मकांड तसेच बौध्द आचार संहितेचे पालन करणे आदी विषयावर चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत.

           कार्यक्रमाचे संचालन भारतीय बौध्द महासभा चिमुरचे सरचिटणीस नथ्युजी रामटेके करणार आहेत तर प्रास्ताविक संघटक शिवराम मेश्राम करणार आहेत.उपस्थितांचे आभार समता सैनिक दल चिमुरचे उपाध्यक्ष पितांबर खोब्रागडे हे मानणार आहेत.

            कार्यक्रमाला उपस्थित राहुन सहकार्य करण्याचे आवाहन भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा चंद्रपुर (पुर्व) चे संघटक नारायण कांबळे गुरुजी यांनी केले आहे.