
2014 पासून ते आजतागायात 2004 ते 2014 पर्यंत 10 वर्षे काँग्रेस सत्तेत होती.शिवाय प्रधानमंत्री सुद्धा मनमोहन सिंग ( लोकशाहीत दुसऱ्यांदा पद उपभोगणे हे लोकशाहीला घातकच ) हेच होते…..
शिवाय कसाबचा मुंबईवर अतिरेकी हल्ला……..
आदर्श घोटाळा…….
बोफोर्स प्रकरण…….
इत्यादी कारणामुळे भारतीय जनता काँग्रेसला कंटाळली होती आणि सत्ताबद्दल होणे ते स्वाभाविक पण होते.
याउलट तुम्ही गुजरात पॅटर्न देशात राबविण्याची आम्हाला स्वप्ने दाखविली.काँग्रेसच्या काळात देशातील बड्या उद्योजकांनी आणि नेत्यांनी चोरलेला पैसा स्विस बँकेत ठेवला तो पैसा काढून आणून प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकण्याचे तुमचे आश्वासन….
गॅस,डिझेल,पेट्रोलचे गगनाला भिडलेले भाव जमिनीवर आणण्याचे तुमचे आश्वासन……
आमच्या महाराष्ट्रातील तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंढे यांचे मुंबई बॉम्बस्फ़ोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातून खेचत आणण्याचे आश्वासन…..
जगात भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर नेण्याचे आश्वासन….
मन की बात द्वारे ” अच्छे दिन ” चे आश्वासन…..
EVM वर धांदली करुन काँग्रेस सत्तेत आल्याचा दावा करुन EVM हटवीण्याचे आपले आश्वासन..
लघु उद्योगासाठी 5 लाख ते 50 लाखापर्यंतच्या कर्जाचे आश्वासन….
बहेनो और भाइयों ची अनेक आश्वासने……..
वरील प्रकारच्या आश्वासनाला भाळून भारतीय जनतेने 2014 मध्ये आपल्याला केंद्रात बहुमताने सत्तेत बसवीले.
तुम्ही 2014 ते 2019 पर्यंतच्या पहिल्या पाच वर्षात पायाला एअर इंडियाची भिंगरी बांधून बिन बुलाए मेहेंमानची जगभ्रमंती केली.नोटबंदी करुन भाजपच्याच नेत्यांचा फायदा केला.आम्ही मात्र 15 लाख रुपयाच्या आशेवरच 5 वर्षे काढली. अच्छे दिन च्या नावाखाली 60 रुपयाचे पेट्रोल 100 वर पोहोचले, गॅसचे भाव साढेतीनशे रुपयावरून 1000 वर पोहोचले. गोडेतेलाचे भाव सुद्धा सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले.मोफत गहू, तांदूळ देऊन आम्हाला दारिद्र्य रेषेच्याही पार खाली नेऊन आम्हाला भिकारी बनवलं. आमचे गरीब विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करुन करुन ते एज आऊट झाले,पण तुम्ही मागच्या दाराने जागा भरून आमच्यावर अन्याय केला. कोणतेही अनुशेष भरून काढलाच नाही.उलट सार्वजनिक सेवेचे ( रेल्वे, विमान ) खाजगीकरण करुन संविधानिक आरक्षण संपुष्टात आणले.
जेंव्हा 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले,तेंव्हा तुम्ही मागची आश्वासने विसरून नवीन यादी केली.त्यात 15 ऑगस्ट 2022 ( म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात )पर्यंत आमच्या देशात प्रत्येकाला पक्की घरे मिळतीलचे आश्वासन दिले.
म्हणजे आम्हा भारतीयांना तुमचा हा अनुभव आला होता की तुम्ही,जे बोलता ते करत नाहीत,आणि जे करता ते बोलत नाहीत.या धोरणाने तुम्ही RSS / मनुवादी कूटनितीचा कुटील डाव टाकला.
या सर्व कृतीतून तुम्ही 1925 ते 2025 च्या RSS च्या शताब्दी वर्षाची तयारी करत आहात हे आम्हाला उशिरा समजले.
2019 मध्ये तुम्ही (नॉन बायलॉजिकल प्राणी,एक तडीपार,मोहन भागवत अर्थात RSS म्हणजेच भाजप) अब की बार 300 पारचा नारा दिला. तोपर्यंत EVM सेटिंग बऱ्यापैकी झालेली होती.जगातील अनेक एक्स्पर्टकडून ( लाच देऊन ) तुम्ही त्याची तयारी करुन घेतली होती.दुसरीकडे जनतेला अनेक स्वप्ने दाखविली.पाच ट्रिलियन डॉलर्सची स्वप्ने दाखवून भारत जगात पाचवी अर्थव्यवस्था बनणार असे तुम्ही बरळत गेले. प्रत्यक्षात चित्र उलटे होते.तुम्ही राजस्थान,मध्य प्रदेश,महाराष्ट्र मधील राजकारण रसातळाला नेऊन तेथील काँग्रेसची सरकारे पाडून ईडी,सीबीआय चा धाक दाखवून आपले सरकार बनवले.आणि शेवटी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही 300 पारचे स्वप्न EVM च्या मदतीने खरे करुन दाखविले!
यावेळी तर काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष विरोधीपक्षनेतेपदच गमावून बसला.तुम्हाला लगाम घालण्यासाठी विरोधकच नसल्यामुळे तुम्हाला रान मोकळे झाले.पंजाब,हरियाणातील शेतकऱ्यांनी दीड वर्षे तुम्ही केलेल्या तीन कृषी काळ्या कायद्याविरोधात दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलन केले. तुम्ही त्यांचे आंदोलन चिरडून 750 च्या वर शेतकऱ्यांना शहीद केले.शेवटी जनतेपुढे नतमस्तक होऊन ते काळे कायदे तुम्हाला रद्द करावे लागले ( जनतेपुढे जगातल्या कोणत्याही मोठयात मोठ्या शक्तीला झुकावेच लागते,हा प्राचीन जगाचा इतिहास आहे)…..
याच पंचवार्षिक काळात तुम्ही सरन्यायाधीशामार्फत सेटिंग करुन घेऊन अयोध्येतील राममंदिर प्रकरण निकाली काढले.त्याचा निकाल सुद्धा रामानेच दिला असे सरन्यायाधीश बरळून गेलेच.शिवाय याच काळात कोरोनाची लाट आली तीचे संकट पेलवण्यासाठी तिजोरीत पैसा नव्हता तर आम्हाला पी.एम.फंडात पैसे टाकण्याचे आवाहन केले,आम्ही 32000 कोटी रुपये त्यात टाकले.RBI कडून सोईचा गव्हर्नर बसवून 171000 कोटी रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. परंतू या पैश्याचा हिशोब मात्र कॅगने मागून सुद्धा तुम्ही दिला नाही..
कोरोनाच्या लाटेनंतर तुम्ही 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागले.त्यासाठी संविधानच बदलण्यासाठी अब की बार 400 पारचा नारा दिला.कारण अर्धेअधिक राज्यात सत्ता आणि केंद्रात पाशवी बहुमतात सत्ता असली म्हणजे संविधान बदलता येते.हा तुम्ही गैरसमज करुन घेऊन कामाला लागले. EVM ची पूर्ण तयारी करुन म्हणजेच भाजपचे सात पैकी संचालक 5 पदाधिकारी त्या EVM बनविणाऱ्या कंपनीचे केले आणि पूर्ण तयारी केली.
परंतू,राहुल गांधींने कन्याकुमारी ते कश्मीर पदयात्रा काढून तुमचे षडयंत्र हाणून पाडले.शिवाय INDIA आघाडी निर्मान करुन हातात संविधानाचे पुस्तक घेऊन सभा गाजवल्या. परंतू त्यांनाही तुमचा EVM चा डाव कळायला वेळ लागला. उलट जनतेला,सर्वोच्च न्यायालयातील वकील संघाला तो कळाला म्हणूनच तर प्रथमच या EVM च्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली होती.
अशा अनेक कारणामुळे तुमचा अब की बार 400 पारचा नारा इथे अपयशी ठरला. महाराष्ट्रातून तुम्हाला मार बसला.परंतू याचा वचपा तुम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर EVM ला 100% सेटिंग करुन काढला की, तुम्हीच थक्क होऊन तोंडात बोटे घालत होता..
एकंदरीत थोडक्यात सारांश असा की तुम्ही या देशातील मोठ्या कष्टाने इंग्रजाना हाकलून अनेक स्वातंत्र्यविरांनी ( सावरकर शिवाय ) देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.त्यानंतर हा देश पुन्हा कधीही गुलामीत जाऊ नये,म्हणून भारताच्या संविधान निर्मितीतून हजारो वर्षांच्या दूरदृष्टीने देशाला एकसंघ ठेऊन विकसनशील भारताला विकसित करण्याची तयारी करुन ठेवली होती. अशा भारताचा….
“संविधानिक ढाचा,उध्वस्त करायला तुम्ही निघालात…
दीड वर्षांपासून मणिपूर जळत आहे तुम्ही तिथे अजूनही पाय ठेवला नाहीत..
गेल्या 11 वर्षांत तुम्ही प्रथम विरोधकांना संपवलं,त्यानंतर प्रशासनाला गुलाम बनवलं,संविधानिक संस्था ताब्यात घेतल्या.शेवटी आमच्या मताचा अधिकार EVM द्वारे हिराऊन घेऊन लोकशाही संपवली.देशावर कर्जाचा माऊंट एव्हरेस्ट निर्माण केला. सर्वसामान्य 85 % टक्के जनतेला 5 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू देऊन भिकारी बनवले. सर्व राज्यपाल,उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती,सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती,सर्व राज्यांच्या राज्य सरकारांना तुम्ही हतबल करुन तुमचे गुलाम बनविले.पत्रकारिता संपुष्टात आणली तिला गोदमध्ये घेऊन गोदी मीडिया बनविले!
शेवटी देशात म्हणजेच केंद्रात आणि अनेक राज्यात EVM सरकारे निर्माण करुन तुम्ही लोकशाही संपवली..
याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची हिंदू दहशतवादी राष्ट्र म्हणून उदयास येण्याची सूचक प्रतिक्रिया नुकतेच युरोपियन देशांकडून झाली आहे!
परंतू….
तुम्ही सर्वजण ( नॉन बायलॉजिकल प्राणी,तडीपार, RSS,भाजप,मोहन भागवत ) लक्षात असू द्या की हा देश 142 कोटी जनतेचा आहे.त्यातील 85 % जनता सर्वसामान्य आहे. आणि ही सर्वसामान्य जनता…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांनी निर्माण केलेल्या भारताच्या संविधानाला जपणारी आहे,त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून प्रथम……
या EVM ला कायमचे गाडू…
त्यासोबतच संविधानाची 100% जागृती जाती धर्माच्या व राजकारणाच्या पलीकडे जाऊन बहुजन ओबीसी समाजापर्यंत संविधानाची अविष्कारीता पोहचवू त्यासाठीच आम्ही पूर्ण ताकदीनीशी संघर्ष करू.हेच आमच्या महापुरुषांना आज रोजी अभिवादन असेल….
अशा विश्वासघातकी प्रधानमंत्री आणि तडीपाराला संधी मिळताच आम्ही बाजूला सारू…
******
जागृतीचा कृतिशील लेखक आणि आवाहनकर्ता…
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689…