उमेश कांबळे
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती तालुक्यातील जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असणारे आम आदमी पार्टी भद्रावती चे सुरज शहा यांची दि.15 जाने ला चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुरज शहा यांनी भद्रावती तालुक्यात भ्रष्टाचार विरोधात काम करणाऱ्यांना धारेवर धरून ठेवले आहेत. धडाडीने जनतेसाठी धाऊन जाणारे नेते म्हणजेच सुरज शहा.
पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास ठेऊन, माझे काम बघून मला ही जबाबदारी दिली त्या बद्दल मी वरिष्ठांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे.
मी जनतेच्या सेवेत निष्टापूर्वक काम करत राहणार असे मनोगत या वेळी नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांनी व्यक्त केले.