सुधाकर दुधे
सावली प्रतिनिधी
सावली तालुक्यातील आदिवासी समाजाची लोकसंख्या लक्षात घेता तालुक्याच्या मुख्यालयी आदिवासींच्या मुलांना व मुलींना शैक्षणिक दर्जा व शैक्षणिक सुविधा व्हावी म्हणून शासकीय आदिवासी मुल, मुलींसाठी वसतिगृहाची निर्मिती करण्यात आली . दोन्हीही वस्तीगृहाला शासकीय इमारत नसल्यामुळे सध्या खाजगी इमारती मध्ये भाडेतत्त्वावर वस्तीगृह सुरू आहेत ..मात्र मुलींची वस्तीगृहातील संख्या 57 असून चार रूम , संडास दोन ,बाथरूम दोन असल्याने मुलींना शौचालयाला जाण्यासाठी व आंघोळ करण्याकरिता रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे मुलींची शाळेच्या वेळेवर तयारी होऊ शकत नाही त्यामुळे त्यांचा शाळेचा टाइम टेबल बिघडतो. चार रूम असल्यामुळे प्रत्येक रूम मध्ये १०/१५ मुलींना बेड नसल्यामुळे जमिनी वर एक गादी वर दोन दोन मुली झोपावे लागत आहे . गर्दीमुळे अभ्यासावर सुद्धा मुलींच्या परिणाम होत आहे त्यामुळे मानसिक व शारीरिक त्रास सुद्धा मुलींना सहन करावे लागत आहे. आदिवासी मुलींचे वस्तीगृह नॅशनल हायवे ला लागून असल्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांचा कर्कश आवाज येत असते आणि दोन्ही बाजूला बियर बार असल्यामुळे अनेकदा दारू पिणारे व्यक्ती आंबट शौकीन मुले केव्हा केव्हा मुलींना बघून शिट्ट्या मारत असतात या ठिकाणी ग्रंथालय नाही पार्किंग नाही प्लेग्राउंड नसल्याने मुलींसाठी खूप अडचणीचा विषय निर्माण झालेला आहे .त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यामुळे सावली तालुक्यातील अद्यावत असलेले मुलींचे वस्तीगृह इमारत बदलवून दुसऱ्या ठिकाणी सोय करण्यात यावी अशी मागणी यापूर्वी विद्यार्थ्यांनी गृहपाल व प्रकल्प अधिकारी यांच्याकडे त्याचप्रमाणे सावली तालुक्यातील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडे मागणी करून एक महिन्याचा कालावधी लोटलेला असून प्रकल्प अधिकारी मागण्या कडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असून संघटनेला व पालक ,विद्यार्थी यांच्या निवेदनांना केराची टोपली दाखवली की काय असाही सवाल निर्माण होत आहे.
तालुक्यातील मुलींच्या वस्तीगृहाला प्रकल्प अधिकारी मृगनाथन व त्यांच्या कमिटीने यांनी प्रत्यक्ष येऊन व्हिजिट केली आणि मुलींना होत असलेली गैरसोय जाणून घेतली व दोन दिवसांमध्ये इमारत आम्ही बदलवून देण्याचे मुलींना आश्वासन दिले मात्र ते फोल आश्वासन अजूनही प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाडले नसल्यामुळे कुठे पाणी मुरतो असाही प्रश्न निर्माण झालेला आहे .
आम्ही सुरक्षित नसल्याचे विद्यार्थ्याकडून बोलले जात आहे. त्याच्यामुळे विद्यार्थिनींनी एक लेखी तक्रार अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेला दिले विद्यार्थ्यांनी च्या समस्या संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याकरिता संघटनेकडे लेखी तक्रार दिल्याने नवीन इमारत उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने सावली येथील मुलीच्या वस्तीगृहासमोर आंदोलन करण्यात येईल अशा इशारा जिल्हा अध्यक्ष अतुल कोडापे, तालुकाध्यक्ष प्रवीण गेडाम, लखन मेश्राम, रमेश कनाके, उतम गेडाम, पुरुषोत्तम पेंदाम, भास्कर गेडाम, मयूर गेडाम, श्यामसुंदर उइके आदी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे.