पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती पारशिवणी तर्फे वसु बारसच्या शुभदिनी गो पूजन.. — गाय आणि वासराच्या उत्सव साजरा.

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

       पारशिवनी:-आजपासून दीपावलीला सुरुवात झाली आहे.दीपावलीला सुरुवात होत असता वसुबारस पुजन केले जाते.यामुळे पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन विभाग पारशिवनीच्या माध्यमातून आज गाय व वासरांचे म्हणजे,”गो पुजन,विधिवत करण्यात आले.

         गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,प्रसन्नता, शांतता आणि समृध्दीचे प्रतिक म्हणून वसुबारस दिवस मानल्या जातो.

           यावेळी सभापती सौ मंगलाताई उमराव निंबोने,उपसभापती करुणाताई भोवते,प.सं.सदस्य श्री संदीपजी भलावी,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. सुभाषजी जाधव,सहाय्यक गट विकास अधिकारी श्री चंद्रकांत देशमुख, श्री.बाळापुरे,श्री.पाटील,पशुधन विकास अधिकारी,पशु वैद्यकीय. दवाखाना पारशिवनीचे डॉ. हातझाडे,तालुका पशुधनविकास अधिकारी (विस्तार ) डॉ.किशोर भदाणे व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे आयोजक पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती पारशिवणी विभागाचे सर्व कर्मचारी व अधिकारी अमित तलमले पशुधन पर्यवेक्षक,सीमा बोरकर पशुधन पर्यवेक्षक,जी.एस.नेवारे पट्टीबंधक,एस.जे.इनवाते व पारशिवनी तालुक्यातील गोपालक शुभम कवडे,सौरभ गिरडकर,संजय सातपैसे, धनराज कवडे सर्व राहणार पारशिवनी आदी ग्रामस्थ उपलब्ध उपस्थित होते.