बदलणारी वाट…

     — मनाच्या खोलीत दडल असतय बरच…                       केव्हा काय ओकेल मन,हे तर सांगणे कठीणच!…

    — कधी मन हसवतय,कधी फुलवतय..                            कधी तेच मन द्वेषाच्या व क्रोधाच्या ज्वाला अग्नित असंख्य भावनांना पण विस्कळित करतय!…

     — मनाने विस्कळित केलेल्या भावना असंख्य दु:खाला जन्म देतात..                   आणि  काही कळायच्या आत त्याच दुःखावलेल्या भावना कधीच्याच स्वतःलाच स्वतःपासून दूर करतात!..

     — भ्रम आणि भ्रमिष्टपणा मनच निर्माण करतय…   असंख्य शंकांचे घर तयार करीत,तेच मन संबंधांनाही बाजूला सारत!….

      — शंका समजणारे मन जेव्हा विचलित व कमजोर ठरतय…                          तेव्हा दोषांची फवारणी करीत तेच मन स्वतःलाही आणि दुसऱ्यांनाही अनेकदा मारतय!..

     — राग व कटूता,रक्त आणि संबंध जानत नाही….   राग व कटूताच्या ओघात लहान झालेल मन दुराग्रही होत चांगल्या भूमिका कधीच वटवत नाही!..

   — मोठेपणा व मोठेपण मनात जोपर्यंत उमजत नाही…                                       तोपर्यंत सुकलेल्या व तुटलेल्या विचारांना मात्र जिवंतपणा येत नाही!….

        — न कळलेल्या मनाला मैत्रीचा विश्वसनीय विशाल उगम जाणवत नाही…                       यामुळेच सदाचारातंर्गत जोडणाऱ्या उत्तम ओलाव्याचे मर्म चारित्र्याला तर कधीच कळत नाही…

     — रक्त आणि संबंध यांच्या बाबत काय असत मनातील नात…                            तर,सर्व काळात आणि सर्व वेळात जिव्हाळा व आपुलकीचे अपार ऋणानुबंध !…

***

             प्रदीप रामटेके

            मुख्य संपादक

           दखल न्युज भारत 

              

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News