शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
भद्रावती येथील विंजासन रोडवर लक्ष्मीनगर वसाहत,पांडव वार्ड अंतर्गत २०१३-२०१४ पासून नागरी वसाहत अस्तित्वात आली आहे.
मात्र,येथील रस्त्यांचे अद्याप खडीकरण किंवा डांबरीकरण झालेले नाही.त्यामुळे येथील १७ कुटुंबांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर बनते.चिखल आणि पाण्याने रस्ते जलमय होऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
या संबंधाने नगरपरिषद भद्रावतीकडे डांबरीकरण आणि ओपन स्पेस विकसित करण्याची मागणी सुनील पोटदुखे,प्रवीण गिरोले,कृष्णमुरारी तिवारी, नितीन चेंदे,रवींद्र राम,अनिल घडले,संजय मासळकर,केशव बोंडे,वैभव सोनुकले,कु.चेतना भगत यांनी नगर परिषद भद्रावतीला २४ मे २०२३ रोजी निवेदनाद्वारे केली व समस्या मांडल्या गेल्यात.
मात्र,१ वर्ष होऊनही या समस्यांवर आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.लक्ष्मीनगरमधील नागरिकांनी नगरपरिषदेकडून त्वरित रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी केली असून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे,अशी मागणी केली आहे.