शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथे आम्रवन दिक्षाभुमी सुगतकुटी भिक्खुसंघ संस्था मालेवाडा आणि संपुर्ण परीसरातील उपासक व उपासीका यांच्या द्वारे आयोजीत १६ डिसेबर ते १७ डिसेंबर २०२४ ला भव्य धम्मपरीषद व भिख्खुंची धम्मदेसना अशा दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम दोन दिवसीय असणार आहे.१६ डिसेबर रोज सोमवारला सकाळी ९ वाजता पंचशील ध्वजारोहण-बुध्दवंदना,समता सैनीक दल शाखा पथ संघाची मानवंदना,१० वाजता भिक्खु संघाची धम्मदेसना,सकाळी ११ वाजता भिक्खुसंघाला भोजनदान होणार आहे.
दुपारी १ वाजता बुद्ध आणी धम्माचे भवितव्य याविषयांवर डॉ.अधीन चंदेल,प्रा.संजय मगर फुले शाहु आंबेडकरी विचारवंत ब्रम्हपुरी,प्रा.शेषराव संसारे धम्म मित्र तथा संवीधान प्रचारक चंद्रपुर,डॉ.हरेस गजभीये,सुरेश राऊत,काशीनाय गजभीये,ओमभाऊ खैरेराजुभाऊ कापसे,जगदीश रामटेके,आशोकजी रामटेके,यांचे मार्गदर्शन करणार आहेत.
सांयकाळी ६ ते १२ वाजतापर्यंत बुध्द भीम गीतांचा कार्यक्रम तसेच राजी १२ ते ५ वाजता पर्यंत महापरित्रणपाठ भंतेजी द्वारे होणार आहे.
तसेच १७ डिसेंबरला आरोग्य शीबीर डॉ.आशीष पाटील चिमूर,डॉ.संजय पाटील जांभुळघाट यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
दुपारी १ वाजता गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेवरावजी कीरसान,चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कीर्तीकुमार भांगडीया,प्रा.नीलेश रामटेके,यशवंत सरदार,जयंत गौरकार,दीवाकर कुंभारे,राजेश कांचळे,कालीदास भोयर सरपंच मालेवाडा,डॉ.समीर कदम,हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.यानंतर लागलीच सत्कार समारंभ होणार आहे.
३ ते ५ वाजता पर्यंत भिख्खुंची धम्मदेसना होणार आहे.सायंकाळी ५ वाजता भोजनदान होईल.
सांयकाळी ६ वाजता भिक्खुसंघाची धम्मदेसना व सोबतच मंगलमैत्री होणारआहे.या कार्यक्रमाला उपस्थीत राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.