परभणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यु नेमका कशामुळे झाला?? याला जबाबदार कोण??? याची चौकशी व्हायलाच हवी.
श्री.शिवाजी लाॅ काॅलेजचा विद्यार्थी असलेल्या सोमनाथचा उल्लेख काही,”बिकाऊ न्यूज चॅनल ‘आरोपी’ असा करताहेत. ही कसली पत्रकारिता?
…विटंबना करणार्याचा हेच पत्रकार ‘माथेफिरू’ म्हणून उल्लेख करताहेत.पोलीस दप्तरी तशी कुठेही नोंद नाही.’या माणसाची सखोल चौकशी होऊन यामागचा सुत्रधार शोधून काढावा’ अशी मागणी न करता अशा भलत्याच भरकटवणार्या बातम्या देण्याचा दबाव चॅनल्सवर कोण आणतं???
अशावेळी सत्ताधार्यांना धारेवर धरणं हे मिडीयासकट प्रत्येक सजग नागरिकाचं कर्तव्य आहे.सोशल मिडीयावर काही भंपक बांडगुळं सत्ताधार्यांना जाब विचारायचा सोडून विरोधी पक्षांविषयी अफवा पसरवताहेत.ही पिलावळ मुळ मुद्दा सोडून कुणाच्या आदेशानं आगीत तेल ओतत असेल??
आज खुलेआम मुडदे पडताहेत.गुन्हेगारांचे सत्ताधाऱ्याबरोबर फोटो व्हायरल होताहेत.अंबरनाथच्या चिमुरड्यांवर बलात्कार झालेल्या प्रकरणाच्या तपासाचे पुढे काय झाले? की एनकाऊंटर करून प्रकरणाचा तपास दाबला?जनता दहशतीत वावरतेय.कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडालेल्या आहेत… हे सत्ताधार्यांचे दारूण अपयश आहे.
सत्ताधीशांनो,राज्य इव्हीएमच्या बटनांसारखं चालत नाही हे लक्षात ठेवा… सुविहीत राज्यकारभार करायला संवेदनशीलता,संविधानाप्रती निष्ठा आणि जनतेविषयी कळवळा असावा लागतो…तो नाही तुमच्याकडे.
–“कुर्सी है तुम्हारा ये जनाज़ा तो नहीं है…
कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते?