परभणी प्रकरणातंर्गत भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू कसा काय झाला?:- अँड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांचा सवाल..

           परभणीत वडार समाजातील भीमसैनिक – सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे,हे अत्यंत वेदनादायक,आणि दुःखद आहे.

     त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला,हे वेदनादायक आहे.

     सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने,आमचे वकील न्यायालयाला विनंती करतील की पोस्टमॉर्टम (सीटी स्कॅन, एमआरआय, फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजिकल) तपासणी फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयातच केली जावी.याचे चित्रीकरण करण्यात यावे.

    फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांच्या देखरेखीखाली याचे पोस्टमॉर्टम केले जावे.

   आम्ही न्यायासाठी लढत राहू !

      ॲड.प्रकाश आंबेडकर

राष्ट्रीय अध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी…