सुमारे पाऊणेचार हजार वर्षांपूर्वीच्या आर्याच्या अतिक्रमणाची पुनरावृत्ती संविधान आणि प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अर्थात 2025 मध्ये.
सर्व बहुजनहो आणि संविधाननिष्ठ,देशभक्तहो,विज्ञानवादी,विवेकवादी म्हणजेच मानवतावादी आणि विशेष म्हणजे आपापल्या कट्टर आंधळ्या धर्मापेक्षा निसर्गाला आणि मानवता धर्माला मानणाऱ्या मूलनिवासी आणि पूर्वीच्या शूद्र,अती शुद्रानो,काळाच्या ओघात वाहत जाणाऱ्यानो, जय संविधान…
आजच्या भागाचा शेवट करण्यापूर्वी दोन महत्वाच्या ऐतिहासिक घटनाचा इथे उल्लेख करणे भाग आहे.एक मानवतावादी आणि दुसरी मानवताविरोधी.
एकोणीसाव्या शतकात आल्फ्रेड नावाचा एक केमिकल इंजिनियर आणि शास्त्रज्ञ, उद्योजक होऊन गेला.त्याने मानवाच्या कल्याणासाठी दळणवळणात आणि कृषी क्षेत्रात क्रांती व्हावी म्हणून स्फ़ोटकाची दारू बनविण्यासाठी संशोधनास सुरुवात केली. प्रथम त्याने ब्लास्टिंग ऑइल या द्रवरूपी स्फ़ोटकाचा शोध लावला.नंतर त्यात हळू हळू सुधारणा करत करत डायनामाईट पर्यंत पोहोचला.उद्देश हाच की,या शोधातून विहिरीतील पाण्याला झरे फोडता येतील,रेल्वेचे व सडकेचे डोंगर फोडून बोगदे खोदता येतील.जेणेकरून दळणवळणात आणि कृषी क्षेत्रात हरित क्रांती घडून मानवी जीवन सुखी होईल.आणि तशी क्रांती सुद्धा यशस्वी झाली…
त्यासाठी त्याने वेगवेगळ्या 64 देशात स्वतःची मालकी असलेल्या अनेक कंपन्या याच डायनामाइटच्या निर्मितीसाठी काढल्या.अबजावधीची संपत्ती त्याने कमावली.तो शेवटपर्यंत अविवाहित राहिला.स्फ़ोटकाच्या संशोधनात अचानक स्फ़ोट होऊन अपघात होत असत.या अपघातात त्याने त्याचा जवळचा मित्र आणि सखा भाऊ गमावला.परंतू मानवी कल्याणासाठी झपाटलेल्या ध्येयवेड्याना दुसरे काहीही दिसत नसते.
परंतू,जेंव्हा त्याने बनविलेल्या डायनामाइटचा वापर निरापराध लोकांचा आणि युद्धात सैनिकांचा बळी जात होता.तेंव्हा त्याच्यातील बुद्ध जागा झाला.आणि पश्चातापातुन त्याने जीवनाच्या शेवटी एक दृढसंकल्प करुन लगेच आचरणात आणला.
त्याने सर्व कंपन्या विकल्या सर्व पैसा जमा केला जवळपास 1896 मध्ये ती रक्कम 96 लाख अमेरिकन डॉलर्स एवढी होती.ती रक्कम त्याने स्वीडन सरकारला दान दिली आणि सांगितले की,या रकमेवर दरवर्षी जे मुद्दल सोडून व्याज येईल.त्या व्याजाच्या रकमेतून मानवी कल्याणासाठी झटणाऱ्या सहा लोकांना माझ्या नावाने पुरस्कार द्यावा.तेंव्हापासूनच जागतिक नागरी नोबेल पुरस्काराची निर्मिती 1900 पासून सुरुवात झाली.
पुढे 1945 मध्ये स्थापन झालेल्या युनोने 10 डिसेम्बर 1948 रोजी मानवी हक्काचा 30 कलमांचा जो जाहीरनामा घोषित केला.तो दिवस म्हणजे जागतिक मानवी हक्क दिन होता.जो आल्फ्रेंड नोबेल चा स्मृतिदिन आहे..
असा हा लोककल्याणासाठी वाहिलेला महामानव….
तर दुसरीकडे मानवताविरोधी कू तत्वज्ञान निर्माण करणारा आर्यचाणक्य उर्फ विष्णुगुप्त कौटिल्य.
आपल्या देशात जेंव्हा इ. स. पूर्व चौथ्या शतकाच्या सुरुवातीला सम्राट धणानंदाचे राज्य होते. त्याच्या पदरी हा आर्यचाणक्य उर्फ विष्णुगूप्त कौटील्य राजकीय सल्लागार म्हणून पुरोहिताचे काम पाहत होता.
राजा जरी धणानंद असला तरी महत्वाच्या निर्णयात याचा मोठा वाटा असायचा. त्यामुळे राजाचे इतर सरदार त्याच्यावर खुनशिनेच राहत असत.
एक दिवस इतर सरदारांनी राजाला विचारले की,तुमच्या महत्वाच्या निर्णय घेण्यात तुम्ही स्वतः सक्षम नाहीत का? की प्रत्येक वेळी त्याचा सल्ला तुम्हाला मानावा लागतो.
तेंव्हा राजाने स्वतःअंतर्मुख होऊन विचार केला.तेंव्हापासून त्याचा सल्ला घेण्यास नकार देत गेला.एक दिवस तर धणानंदाने तर त्याचा भर दरबारात अपमानच केला. तेंव्हा आर्यचाणक्य रागाने लालबुंद झाला आणि भरदरबारात शपथ घेतली की तुझ्या राज्याचा नायनाट केल्याशिवाय शेंडीला गाठ मारणार नाही.असे म्हणून त्याने शेंडीची गाठ सोडून पाय आपटत निघून गेला.
त्याचवेळी धणानंदाचा सैन्यात सेनापती असलेला चंद्रगुप्त मौर्य हा धणानंदाचा दासीपुत्र होता.आपल्या आईवर झालेल्या अन्यायाचा सूड उगविण्यासाठी संधीची वाट पाहत होता.
त्याचवेळी अलेक्झान्डर ( सिकंदर ) भारतावर स्वारी करण्यास झेलम नदीच्या किनारी आलेला होता.याच संधीचा लाभ उठविण्यासाठी आर्यचाणक्याने चंद्रद्रगुप्ताची भेट घेतली. दोघेही धणानंदाचे वैरी जुळले.
चाणक्याने चंद्रगुप्ताला आलेक्झान्डरला जाऊन मिळून धणानंदावर स्वारी करण्याचा सल्ला दिला.तेंव्हा चंद्रगुप्ताने तो सल्ला नाकारला.परंतू थोड्या दिवसातच चंद्रगुप्ताने धणानंदावर स्वारी करुन त्याला पदच्युत केले.आणि स्वतः सम्राट बनला.तेंव्हा सुद्धा राजकीय सल्लागार म्हणून पुन्हा त्याच्या पदरी आर्यचाणक्य हाच होता.आता त्याने शेंडीला गाठ मारली होती.
सांगायचे तात्पर्य हेच की स्वतःचा अहंकार ठेचला गेल्यामुळे,अपमानाचा बदला घेणासाठी,प्रसंगी आपल्याच राजाच्या विरोधात जाऊन,देशहितापेक्षा स्वहीत पाहणाऱ्या,बाहेरून आलेल्या आर्यांचे प्रतिक म्हणजे आर्यचाणक्य होय.
जो मानवताविरोधी होता.ज्या चाणक्याने कूटनितीला बळ दिले!
तेच बळ आज समाजाचा, राज्याचा,देशाचा सर्वनाश करताना दिसत आहे.
जो कुटनीतीत तरबेज असतो,जो देश,राज्य आणि समाजावीषयी आतून घृणाशील असतो त्यालाच चाणक्य म्हणतात,याच चाणक्याचा अक्ष म्हणजे डोळा अर्थात नजर म्हणजेच चाणाक्ष अशीही उपाधी आपल्या देशात अमितशहा, शरद पवार, फडणवीस यांना बहाल झालेली आहे.
अशा प्रकारे या दोन एक मानवतावादी आणि एक मानवताविरोधी वैश्विक उदाहरणे आपण बघितली. यावरून हे लक्षात येते की,जगात,देशात, राज्यात आणि समाजात, शहरांत,गावात,घरात,भावा -भावात,बहीण -भावात जे जे चांगलं घडते,जे जे वाईट घडते त्याचे मूळ कोणत्या विचारसरणीत आहे.हे लक्षात येते.याचे वेगळे विश्लेषण करण्याची आवशकता नाही.
देशाच्या स्वातंत्र्यांनन्तर आमचा देश पुन्हा स्वातंत्र्य गमावून बसू नये म्हणून आपल्या घटनाकाराने संविधान बनवताना योग्य ती खबरदारी घेतली होती.
बहुजन समाज आणि ओबीसी समाज मात्र आजही मनुवाद्याच्या अंधश्रद्धेच्या कर्मकांडाच्या बाहेर पडायला तयार नाही.हे भयाण वास्तव अजूनही आहे.एवढेच काय जे प्राध्यापक सायन्स विषय शिकवतात ते सुद्धा खाजगी जीवनात,घरात मात्र अंधश्रद्धेला बळी पडताना दिसतात.
परंतू ,हे सुद्धा तेवढेच खरे आहे की,त्यांच्यातही हळूहळू बदल होताना दिसत आहेत. हे दुर्लक्शुन चालणार नाही.
खरे पाहता बौद्ध समाजाने तथागत भगवान बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जे वैश्विक रुप आहे.ते त्यांनी मर्यादित केल्यामुळे इतर बहुजन समाजाचा एक गैरसमज निर्माण झालेला आहे की,संविधान म्हणजे आरक्षण यापलीकडे समजून घेण्यात बहुजन समाजाने कधी प्रयत्नच केला नाही.म्हणून संविधानाची अविष्कारीता झाली नाही.हेच वास्तव आहे.
परंतू,आतामात्र सर्वांनीच या आपल्या दुःखाला जगाच्या वेशिवर टांगायचे असेल तर, संविधान समजून घेणे,त्यातील विज्ञानवादाची स्वीकारार्हता,विवेकवादाची अविष्कारीता,मानवतावादाची विशालता समजून घेणे ही ओबीसी,बहुजन समाजातील तरुण सुशिक्षित युवापिढीची ( युवक / युवती ) गरज निर्माण झाली पाहिजे.
स्वातंत्र्य, समानता,न्याय,बंधुता,समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या लोकशाही मूल्यांची अविष्कारीता करण्यासाठी,संविधान आणि लोकशाहीला ICU तून बाहेर काढण्यासाठी भारताचा नागरिक या नात्याने प्रत्येकाचे घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य होऊन बसले आहे.
आज 2024 च्या काळात देशात आणि राज्यात सगळीकडे 2014 पासून RSS /भाजप वाल्यांनी कुटनीतीचा वापर करुन लोकशाही आणि संविधान संपविण्याचा विडा उचलला आहे.
त्यासाठी त्याने म्हणजेच मोहन भागवत, मोदी – शहाने इतर सर्वच राजकीय पक्षांना काँग्रेससहित लुळे पांगळे करुन सोडले.विरोधी पक्ष सुद्धा ठेवला नाही.अशा काळात या कूटनितीच्या राजकीय पक्षांच्या उपकारावर संविधान आणि लोकशाही टिकणार आहे का?
हा प्रश्न तमाम भारतीय नागरिकांना आहे. कारण संविधानातील उद्देशीका ही कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला आव्हान करत नाही.
तर ती केवळ भारतीय नागरिकांनाच लोकशाही आणि संविधानाची जपणूक करण्याचे आव्हान करते आहे.
म्हणून या भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कातील सर्वोच्च स्थान असलेल्या मताच्या अधिकाराला हिरावून घेण्यासाठी याच संपूर्ण व्यवस्थेने EVM वरच सर्व निवडणुका घेऊन 2004 पासून आम्हाला पुन्हा गुलामीत टाकण्याचे षडयंत्र चालवले आहे.
आज आमच्यासाठी EVM म्हणजे,”मनुस्मृती,आहे. तीला हटविणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे.
ही मनुस्मृती हटवल्यानंतर आणि सोबतच,लगेच भ्रष्टाचार,जातीअंतःचा लढा तीव्र करावा लागेल.हे काम कोण्या राजकीय पक्षाचे नव्हे तर, प्रत्येक भारतीय नागरिकांचे आहे.
जय भारत,जयभिम,नमस्कार, सतश्री अकाल,जय जिनेंद्र,अस्सलाम वालेकुम,जय संविधान…..
*****
टीप :- सर्व पाचही भाग आपण अभ्यासून स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीला प्रश्न विचारून सदविचारी बनावे…..
अत्त दीप भव..
*****
टीप :- या लेखमालेचा आजचा शेवटचा 5 वा भाग आहे. आपल्या मोबाईलमधील वयक्तिक मो. नं. आणि व्हाट्सप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल कराव्यात ….
लेखक आणि आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689