हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाची समस्या निकाली काढण्यासाठी आरोग्यमंत्री ना.सांवत सोबत चर्चा..

 

 जाकीर सैय्यद

जिल्हा प्रतिनिधी वर्धा..

        आमदार समीर कुणावार यांच्या विशेष प्रयत्नाने उपजिल्हा रुगनायांचा समस्यावर तोड़गा काढण्यासाठी आरोग्यमंत्री श्री. तानाजी सावंत यांच्या दालणात आमदार समीर कुणावार सोबत गुरुवारला बैठक झाली. 

       हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्या बाबत गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या,त्या अनुषंगाने आमदार समीर कुणावार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कडुन तोडगा काढण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान त्यांच्या सोबत बैठक केली व पाठ-पुराव्या संबंधात सखोल चर्चा केली.

           त्यांच्या पाठ-पुराव्याल्या यश आले असून आरोग्य सचिव,आरोग्य उपसंचालक ,आयुक्त ,जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या प्रमुख उपस्थित हिंगणघाट मतदार संघातील हिगणघाट,समुद्रपुर, सिंधी रेलवे,वडनेर येथील रुग्णालयाच्या विविध समस्या बाबत सकरात्मक चर्चा झाली असून तातडीने आमदार समीर कुणावार यांनी मण्डलेल्या समस्येवर तोड़गा काढण्याच्या दुर्ष्टिने आरोग्य मंत्री यांनी संबधिताना सूचना दिल्या आहेत. आमदार समीर कुणावार यांनी प्रामुख्याने हिंगणघाट येथे नव्याने मंजूर झालेल्या 400 बेडच्या रुग्णालयाचे अंदाज पत्रक त्यार करुन तातडीने प्रकरण मार्गी लावण्याची इच्छा व्यक्त केली असून हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात सिटीसक्याॅन मशीन अली असून ती सुद्धा उपलब्ध करावी अशी मांगनी केली आहे.

     वडनेर,समुद्रपुर ,सिंधी रेलवे येथील ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत व अधिकारी व कर्मचारांचे निवास स्थान मंजूर करावी,अशी अग्रही मांगनी केली असता ती सुद्धा मागणी आरोग्य मंत्री यांनी मान्य केली.

       हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय मध्ये अनेक वैधकीय अधिकारी,कर्मचारी पदे रिक्त असल्याने रुग्ण सेवेत अडचणी निर्माण होत असल्याचे निर्देशनात आणून दिले.

      यावर मंत्री महोदयानी लवकरच पदे भरण्यात येईल व हिंगणघाट,समुद्रपुर तालुक्यातील अनुक्रमे शेकापुर बाई व कानकाटी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच हड़दगाव आणि मोहगांव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले.

        शेतमजूरावर सद्या रानडुकरानी हौदोस घातला असून शेतकरी गम्भीर स्वरूपाने जख्मी आहेत,राज्याचे वनमंत्री सुधीर मुंगटीवार यांनी अशा गंभीर जख्मी करिता 1. 25 लक्ष रूपयांची मदत जाहीर केली.

        रुग्णालयाच्या डॉक्टरांना गंभीर जख्मी असल्याचे प्रमाण पत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

      येत्या 1 महिन्यात आमदार समीर कुणावार यांनी बैठकीत उपस्थित केलेल्या सर्व समस्यावर तोडगा काढण्याचे निर्देश संबंधीत अधिका-यांना दिले आहेत.