युवराज डोंगरे/खल्लार

     नुकताच पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत नांदगाव बिटस्तरीय क्रीडा महोत्सव 2022-23 चा समारोप सोहळा नुकताच जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा माजरी म्हसला येथे संपन्न झाला.

     कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किरण पाटील मुख्याध्यापक मोखड हे होते तर बक्षीस वितरक म्हणून प्रमिला गोचीडे विस्तार अधिकारी शिक्षण, हरिश्चंद्र गोहत्रे अधीक्षक शालेय पोषण आहार, प्रशांत गुल्हाने मुख्याध्यापक सूर्यकांता गोहत्रे, सूरज मंडे क्रीडा संयोजक, मंचकावर होते तर विशेष अतिथी म्हणून संध्या गुल्हाणें मुख्यायापक सम्राट विद्यालय माजरी म्हसला, शरद रुमणे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती माजरी म्हसला, हेमंत ढेपे सरपंच मांजरी म्हसला आदी मान्यवर क्रीडा मंचावर उपस्थित होते.

      दोन दिवसीय क्रीडा मैदानावर खेळाडूची मेहनत त्यांना विजया पर्यंत घेऊन गेली. क्रीडा महोत्सवात होत असल्याने मुलांचा उत्स्फुर्त सहभाग नोंदविला व खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाकरिता त्यांचे जीवनात खेळाला खूप खूप महत्वाचे असल्याचे प्रमिला गोचीडे यांनी विषद केले. दोन दिवसीय सामन्यांमध्ये प्राथमिक विभाग मधे पुढील शाळेच्या चम्मुंनी विजयश्री संपादन केला. मुलांची कबड्डी जिल्हा परिषद पूर्व मधामिक शाळा मांजरी म्हसला, मुलींची कबड्डी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा येरंडगाव, मुलांचा व मुलींचा खो – खो जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सावनेर, मुलींची लंगडी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शिवनी रसुलपुर या चमू विजय ठरल्या. 

         माध्यमिक विभाग मधे पुढील शाळांनी बाजी मारली. खोखो मुली, हॉलीबॉल मुले, बॅडमिंटन एकेरी व बॅडमिंटन दुहेरी या सामन्यांमध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शिवनी रसुलपुर शाळेच्या विद्यार्थ्यांनी विजय संपादन केला. कबड्डी मुले या सामन्यांमध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सातरगाव यांनी विजय मिळविला. कबड्डी मुली व व्हॉलीबॉल मुली या सामन्यांमध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा येवती यांनी विजय मिळविला. तर खो-खो मुले या सामन्यांमध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा वाघोडा यांनी विजय मिळविला. तर टेनीक्वाईट एकेरी व दुहेरी मधे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मांजरी म्हसला यांनी बाजी मारली.

     वैयक्तिक स्पर्धा प्राथमिक 75 मीटर धावणे, तीन पायाची शर्यत व दोरिवरील उड्या यामध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सावनेर च्या खेळाडूंनी बाजी मारली. 75 मीटर धावणे मुले व पोत्याची शर्यत मधे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा येणस यांनी विजय संपादन केला. तर बटाट्याची शर्यत मधे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मांजरी म्हसला यांनी विजय संपादन केला.

      माध्यमिक विभाग वैयक्तिक स्पर्धेमध्ये पुढील शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले क्रीडा कौशल्य दाखविले. 

100 मीटर धावणे मुली, 400 मीटर रिले मुले व मुली यामधे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मोखड यांनी बाजी मारली. 100 मीटर धावणे मुले चाटी रेस, व लांब उडी, या खेळामध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मांजरी म्हसला यांनी विजय संपादन केला. या क्रीडा महोत्सवाकरिता नांदगाव बिटमधील अनेक शिक्षकांनी परिश्रम घेतले .त्यामध्ये प्रामुख्याने, मनीष अवघड, अशोक बेरड, संदीप झाडे, राजेंद्र काळे, सुनील तायडे, संजय अंभोरे, साबीर शेख, रवींद्र गजभिये, मनोज भांदर्गे, प्रशांत सापाने, अनिल देशमुख, संजय नेवारे, रामेश्वर खंडारे, अजय गावंडे, विजय खानजोडे, कमलाकर कदम, गजानन होळकर, राजेश कडू, मधुसूदन काळमेघ, मनोहर चव्हाण,, परमानंद वैष्णव, संजय घोम, शंकर कवाने, भाऊराव राठोड, विजय नेमाडे, रमेश शिंदे, इरशाद अहमद, राजू पानतावने, भीमसेन देवरे, दीपक कोष्टी, प्रमोद चोपडे, उत्तम डाखोरे नी छाया कराळे, आशा वैद्य, सुमित्रा पालीवाल, उज्ज्वला भडांगे, प्रेरणा पेठे, रेखा सावळे, जयश्री पांडे, अनघा भोपळे, ज्योती जगताप, अनिता जोशी, हर्षमाला मासोतकर, अर्चना कवाने, प्रणिता मनगुळे, राखी सरोदे, मीना नगराळे, राजश्री पांडे, अनिता देशमुख, छाया पोटेकर, लीना उमके, कमल पडघम, सुनिता लोणकर, अर्चना बैतूले, प्रीयंका राणे, हेमलता भिमटे, सुनीता जुंबळे, अनिता जुंबळे, नलू ससाणे, यांचेसह अनेक शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले व क्रिडा महोत्सव यशस्वी केला असे क्रीडा संयोजक सुरज मंडे यांनी कळविले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com