निरा नरसिंहपुर दिनांक :14
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
गिरवी तालुका इंदापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या, चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा ह -भ -प राम महाराज अभंग यांची झाली.किर्तन सेवेत बोलत आसताना अभंग महाराज म्हणाले की,महाराष्ट्रातील वारकरी मंडळी सुखी आसावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नजराना तुकाराम महाराजांन कडे पाठवला परंतु तो दिलेल्या नजराना महाराजांनी स्वीकारला नाही. किती मनाचा मोठेपणा तुकाराम महाराजांचा आहे.वारकरी संप्रदायाचा प्रसार तुकाराम महाराजांनी केला.वारकरी संप्रदायाचा प्रसार करणे म्हणजे याच्यापेक्षा मोठी क्रांती कोणतीच असू शकत नाही.अभंग महाराज वडापुरी कर किर्तन सेवे रुपी बोलत होते.
गिरवी येथील समस्त ग्रामस्थ व भाविक भक्त व ह- भ -प ,अंकुश रणखांबे महाराज वाचक यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा अभंग महाराज वडापुरी यांची झाली . या सप्ताह मधील किर्तन शेवेसाठी आजी-माजी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व आनेक ठिकाणाहून भागा-भागातून भाविक भक्त ग्रामस्थ आणि महिला भगिनी तरुण सहकारी कार्यकर्ते सर्वच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सप्ताहाचे नियोजन व आयोजन अन्नदान व महाप्रसादाची सेवा गिरवी ग्रामस्थांच्या व भाविकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात चालू आहे .दररोज दोन ते तीन हजार भाविक भक्त कीर्तन सेवा व महाप्रसादचा लाभ घेत आहेत.
सप्ताहाच्या शेवटी काल्याचे किर्तन श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज माजी अध्यक्ष देहू संस्थान यांची कीर्तन सेवा होईल.असे ह भ प अंकुश महाराज रणखंबे बोलत होते.
या अखंड हरिनाम सप्ताह साठी विणेकरी , मृदंग वादक, टाळकरी,भाविक भक्त व ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.