रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत मतदारांतील चर्चा व भुमिका बघता यावेळी या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच बाजी मारणार असल्याचे चित्र आहे.
काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.सतीश वारजूकर यांच्या कार्यावर व नेतृत्वावर चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी,तरुणांनी,विद्यार्थ्यांनी, शेतकऱ्यांनी,मजूरांनी,महिला भगिनींनी विश्वास दाखवित असल्याचे दिसून येत आहे.
भांडवलदार ठरलेले आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी ठेकेदारी अंतर्गत केवळ स्वतःचे व स्वतःच्या जवळच्यांचे आर्थिक फायदे करुन घेतले असल्याचे मतदार आता बोलू लागले आहेत.
भाजप आमदार किर्तीकुमार भांगडीयांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी काहीच केले नाही व विद्यार्थांचा सोयीसुविधांसह त्यांच्या प्रतिनिधीत्वासाठी ब्र शब्द सुद्धा विधानसभेत काढला नाही.यामुळे मतदार त्यांच्यावर कमालीचे नाराज असल्याचे बोलले जात आहे.
डॉ.रमेशकुमार गजबे निवडणूकीच्या तोंडावर मित्राच्या मुलाला पराभवापासून वाचवण्यासाठी भाजपात गेले असल्याची चर्चा आहे.डॉ.रमेशकुमार गजबे हे समाजहितासाठी भाजपात गेलो असे म्हणत असले तरी त्यांनाही माहिती आहे भाजपाने देशातील आदिवासींच्या जमिनी जबरदस्तीने भांडवलदारांच्या घसात टाकल्या आहेत आणि आदिवासींवर खूप मोठा अन्याय केला आहे.आदिवासिंना भुमिहिन केले आहे.
तद्वतच त्यांना हेही माहीत आहे भाजपा माना समाजाला कायदेशीर हक्क मिळवून देऊ शकत नाही.
तरीही ते म्हणत असतील की मी समाजहितासाठी किंवा देशहितासाठी भाजपात आलो आहे तर हे प्रामुख्याने मतदारांसोबत मजाकबाजीच ठरेल…
आरक्षणाविरोधात म्हणजे लोकांच्या हक्का विरोधात विविध संघटना द्वारे आंदोलन करणाऱ्या भाजपा या पक्षावर डॉ.रमेशकुमार गजबे हे विश्वास कसे काय दाखवितात हेच कळेनासे झाले आहे.
यामुळे चिमूर विधानसभा मतदारसंघातील आदिवासी व माना समाज मतदार हे संभ्रमात आहेत,आणि या समाजातील मतदार त्यांचे ऐकतिल असेही नाही…
मात्र,काँग्रेस उमेदवार डॉ.सतीश वारजूकर यांनी अनेक जनआंदोलना द्वारे प्रचंड लोकप्रियता,”चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदारात निर्माण केली असून,स्वतःचे जनहितार्थ कार्य मतदारांच्या हृदयात स्थानबध्द केले आहे.
उद्या देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी चिमूरात येत आहेत.ते चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना संबोधन करतीलच.पण ते काय बोलतील याकडे मतदारांच्या नजरा लागल्या आहे.