इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी इथून पुढची पाच वर्षाची संधी मला द्या… — युवकांना रोजगार नवीन कारखानदारीची निर्मिती व उद्योग धंदे, शेतीसाठी पाणी विजेचा प्रश्न मार्गी लावू :- प्रवीण भैया माने

बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपूर प्रतिनिधी

              इंदापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांना भैय्या कोकाटे व मित्र मंडळ सरांनी यांचा जाहीर पाठिंबा मिळाल्यामुळे मतदारांचा व लोकांचा चांगलाच प्रतिसाद असल्याचे चित्र बावडा/लाखेवाडी गटात सराटी येथे दिसते आहे.

           2024 च्या इंदापूर तालुका विधान सभेचे परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार माजी सभापती प्रवीण भैया माने यांच्या प्रचारासाठी जनतेचा व मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

          सराटी तालुका इंदापूर येथील प्रचार सभेला हजारोच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

          जाहीर सभे प्रसंगी उमेदवार प्रवीण भैया माने बोलत असताना म्हणाले की मला इंदापूर तालुक्याची सेवा करण्यासाठी पुढची पाच वर्षे द्या, सर्वांगीण विकास व तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही.

         कष्टकरी शेतकऱ्याच्या शेतीला पाण्याचा प्रश्न असो अथवा विद्युत लाईटचा प्रश्न असो, दोन्ही नद्यावर बुडीत बंधारे करून बारमाही पाणी शेतीला पुरेल यासाठीही मी प्रयत्न करीन तसेच गोरगरीब कष्टकरी मजुरांच्या हाताला कामे मिळवून देण्यासाठी तालुक्यामध्ये नवीन कारखानदारी उभा करून उसाचा प्रश्न सोडवून, एमआयडीसीच्या माध्यमातून तरुण वर्गाला कामे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन, शेतीमालाला योग्य भाव अशा अनेक तालुक्याच्या विकास पर योजनेसाठी नेहमीच मी प्रयत्न करीत राहणारच आहे, अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांचे सराटी येथील जाहीर सभेत उद्गार.

          परिवर्तन विकास पॅनलचे प्रचार प्रमुख व मार्केट कमिटीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील प्रचारा निमित्त मतदारांना संभावित करीत असताना म्हणाले की प्रवीण माने यांच्या समोरील दोन विरोधी उमेदवाराची पायाखालची माती सरकलेली असल्यामुळे ते विकास कामावर बोलत नाही तर प्रवीण भयावर नेहमीच टीका टीपणी करतात.

            इथून पुढे जशास तसे आम्ही उत्तर देऊ, तालुक्यातील जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे म्हणूनच जनतेने प्रवीण माने यांना उमेदवारी मिळवून दिलेली आहे, 100% प्रवीण भैय्या माने यांचा विजय निश्चित ठरलेला असल्यामुळे चिंता करण्याची काही काळजी नाही, मयूरसिंह पाटील यांचे उद्गार..

            सराटी येथील भैया कोकाटे यांनी प्रवीण भैया माने यांना पाठिंबा देऊन परिवर्तन विकास पॅनल मध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे.

             भैय्या कोकाटे प्रवेशानंतर बोलत असताना म्हणाले की मी गेली पाच वर्षापासून दत्तामामा भरणे यांना साथ दिली परंतु काहीही हाती आले नाही.माझ्या तरुण कार्यकर्त्यांचे प्रश्न सुटले नाही कोणतीही कामे झाली नाहीत. म्हणूनच मी आज प्रवीण भैया माने यांना साथ देऊन माझ्यासहित सर्व शेकडो कार्यकर्ते आम्ही मिळून प्रवीण भैया माने यांना पाठिंबा दिला असे मी जाहीरपणे सांगतो,भैय्या कोकाटे यांचे उद्गार..

         अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांची सराटी येथील जाहीर सभा पार पडली सदर सभेला प्रत्येक गावातून लोकांनी उदंड असा प्रतिसाद मिल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

              सराटी येथील भैय्या कोकाटे व यांचे सर्व कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रवीण भैया माने यांचे जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून स्वागत करून उत्स्फूर्तपणे वाजत गाजत रॅली काढल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भैय्यासाहेब कोकाटे यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला.

         सराटी येथील प्रचार दौऱ्यामध्ये उमेदवार प्रवीण भैया माने, मयूरसिंह पाटील भैया कोकाटे , उमेश घोगरे, बाळासाहेब कोकाटे, सुदर्शन बोडके,सनी बंडगर ,ह भ प माने महाराज, दळवी सर, या सर्वांनी जाहीर सभेत आपापले विचार व्यक्त केले.

          सदर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती विधानसभेचे उमेदवार प्रवीण भैया माने व माजी समिती सभापती मयूरशिह पाटील, विजय घोगरे,नागेश गायकवाड, उमेशरावजी घोगरे, शरद नाना चितारे ह भ प माने महाराज, बाळासाहेब कोकाटे, सुदर्शन बोडके, विठ्ठल देशमुख, चंद्रकांत सरवदे, समाधान सरवदे, महेश शिरसागर नामदेव बोडके, बालाजी बोडके, दिलीप बोडके, निखिल मगर, राहुल कांबळे, अण्णासो पाटील, नागनाथ गायकवाड, ऋषिकेश सुतार, शंभुराजे चौगुले,नौशाद शेख, समाधान सुतार, वैभव सूर्यवंशी,नागेश लावंड, चक्रधर सूर्यवंशी ,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व बावडा ते लाखेवाडी गटातील व प्रत्येक गावातील तरुण कार्यकर्ते सराटी येथील पालखी मैदानावर जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

       इंदापूर तालुक्याचा चौफेर विकास करण्यासाठी मला एक वेळ आमदार होण्याची संधी द्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही.

         तसेच तालुक्यातील युवकांना नवीन कारखानदारीची निर्मिती करून रोजगार मिळवून देऊ व शेतीसाठी वीज, पाणी, गोरगरिबांच्या हाताला कामे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील.