दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे ४थे राज्यस्तरीय महायोगोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे चौथे योगशिक्षक संमेलन दिनांक १६ व १७ नोव्हेंबर रोजी आळंदी देवाची येथील फ्रुटवाला धर्मशाळा येथे आयोजित करण्यात आलेले आहे. महायोगोत्सवास संपूर्ण महाराष्ट्रातून एक हजार योगशिक्षक उपस्थित राहणार आहेत.
योगशिक्षक संमेलनाचे उद्घाटन १६ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता कैवल्यधामचे सीईओ डॉ.सुबोध तिवारी जी यांच्या हस्ते होणार आहेत त्यावेळी इंद्राणी फाउंडेशनचे संस्थापक पूनित बालन, बेल राईज इंडस्ट्रीजच्या सुप्रिया बडवे, द लोणावळा योग इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर डॉ.मन्मथ घरोटे, शांतीब्रम्ह मारुती महाराज कुरेकर, स्वामी उमानंद, डॉ.राजेंद्र खेडेकर, आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मनोज निलपवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेले आहे.
अनेक मान्यवरांची व्याख्यानाचे आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे तसेच, संमेलनाचा समारोप १७ नोव्हेंबर रोजी माजी संमेलनाध्यक्ष दिनेश भुतेकर,अशोक पाटील,विनायक बारापात्रे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
आळंदी येथे होणाऱ्या महायोगोत्सवात अधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन योगशिक्षक संघाचे संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मनोज निलपवार, महासचिव अमित मिश्रा, कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सचिव शरद बजाज व नियोजन समितीचे अध्यक्ष प्रा.सदानंद वाली, प्रभाकर कोळसे राज्य मिडिया प्रभारी, पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रज्योती दळवी, उपाध्यक्ष सारिका काकडे, सहसचिव प्राजक्ता देव, कोषाध्यक्ष आश्लेषा मोहिते व नियोजन समितीच्या अध्यक्षा मारिया यांनी केलेले आहे