सुजात आंबेडकर महाराष्ट्र राज्यातील ताकदवर नेतृत्व!… — महाराष्ट्र राज्यातील जनतेचे रक्षण त्यांच्या विचारातंर्गत कृतीत दडलेले…

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

         सुजात अंजली प्रकाश आंबेडकर हे सामाजिक चळवळीतील व राजकीय क्षेत्रातील ताकदवर नेते असून महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेचे,शेतकऱ्यांचे,विद्यार्थ्यांचे, मजुरांचे,दिनदलित वंचितांचे,बहुजनांचे,रंजल्यागांजल्यांचे,रक्षण त्यांच्या विचारातंर्गत कृतीत ठळकपणे दिसायला लागले असल्याने ते महाराष्ट्र राज्यात विविध अंगांनी सामाजिक चळवळीला बळकटी देत राजकीय परिवर्तन घडवून आणतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

          वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व सुजात आंबेडकर हे माजी प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर आणि अँड.बाळासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव आहेत हे सर्वांनाच माहीत.

         पण,सुजात आंबेडकर यांना ज्या दृष्टीने घडविण्यात आले ती दृष्टी सखोल विचारांची व तर्कसंगत सामाजिक न्याय हक्काची आहे हे लक्षात येते आहे.

        अर्थात त्यांना घडविताना महाराष्ट्र राज्यासह देशातील नागरिकांच्या हिताचा सर्वोच्च विचार करण्यात आल्याचे स्पष्ट जाणवते आहे.

           सुजात आंबेडकरांना प्रत्यक्ष पुढे ठेवून जेव्हा विविध क्षेत्रातंर्गत चर्चा घडवून आणली जातय किंवा जाहीर सभांमधून ते मनोगत व्यक्त करतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जराही भिती दिसत नाही.तद्वतच न थांबता उत्तर देणे आणि आवश्यक तेच संबोधन करणे हे सुजात आंबेडकरांना जमत असल्याने ते महाराष्ट्र राज्यासह भारत देशातील मोठे सामाजिक व राजकीय अनुभव शक्ती असतील असे दिसते आहे.

          आत्मविश्वासातंर्गत त्यांच्यातील कार्यपद्धत हे प्रामुख्याने अनेकांचे भविष्य घडविणारी आहे व सर्व समाजाला तारणारी आहे असे प्रामुख्याने जाणवतो आहे.

        विविध समाजातंर्गत सामाजिक शक्ती जुळवायला म्हणजे एकत्रित करायला वेळ लागतोय,या सत्यला प्रामुख्याने लक्षात घेतले तर सुजात आंबेडकर हे महाराष्ट्र राज्यात प्रचंड सामाजिक शक्ती जुळवायला सक्षम आहेत आणि ते आवश्यक वेळेत ती शक्ती आपल्या बाजूने करतील हा आशावाद गृहीत धरलाच पाहिजे.

             पक्षाचे उतंम नियोजन कसे करायचे आणि पक्षाच्या ताकदीचा वास्तव सदोपयोग कसा करायचा हे ज्या नेतृत्वाला जमतय ते नेतृत्व नेहमी यशस्वी व सक्षम ठरत असतय.

          परत्वे मार्गदर्शनातून पक्षाची सर्वोतोपरी ताकद वाढविण्याचे काम ज्यांना जमतय ते पक्षाचे उतंम संघठक ठरतात,परिवर्तनाचे साक्षीदार असतात या वास्तव्याकडे सुजात आंबेडकर हे कधीच दुर्लक्ष करणार नाही,असेही मानून घेवूया…

          अमाप धनसंपदा आणि पक्षाची मोठी जन ताकद असलेल्या भाजपा,काँग्रेसला जेव्हा सुजात आंबेडकर आपल्या कुशल विचारांनी जेव्हा मागे टाकतात आणि सर्व समाजहितासाठी त्यांचा कुठल्याही प्रकारचा अन्याय-अत्याचार सहन करणार नाही असे जाहीर पणे ते बोलतात तेव्हा त्यांच्या विचारांची प्रगल्भता ठळकपणे पुढे येतेय.

        याचबरोबर सर्व समाजातील मनुष्य मात्रांच्या रक्षणाची जबाबदारी घेणारा व स्विकारणारा,निर्मळ मनाचा नित्तीमुल्य सुजात आंबेडकर भविष्य काळातील जनाधार असेल.

        ते महाराष्ट्रातील कुटनितीच्या प्रवृत्तीला बाहेर आणतील आणि त्यांच्या जहरी ध्येयांना पुढे चालून थोपवतील असा दम त्यांच्या नेतृत्वात असेलच!

      वंचित बहुजन आघाडीची सातत्याने ताकद वाढविण्यासाठी त्यांचे शिल्लेदार हे केवळ बोलबच्चन असणार नाहीत तर ते समाजमनात रुजणारे पदाधिकारी असतील याकडे सुध्दा ते लक्ष केंद्रित करतील असे भाकीत करण्यास हरकत काय?

       वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड.प्रकाश आंबेडकर यांच्या विचारात मजबूत होतांना सुजात आंबेडकर हे महाराष्ट्र राज्यातील एक ताकदवर जननेता झाले आहेत.

       आणि त्यांच्या कृतीतून,ध्येयातून नेहमी जनहित व जनसंरक्षण पुढे येत असल्याने त्यांच्या विचार कृतीत उज्वल महाराष्ट्र राज्य दिसतो आहे….

          मात्र यासाठी पक्षाचे खांदे हे सातत्याने गतिमान व गतिशील असायलाच पाहिजे.